advertisement

ओला कचरा, सुका कचरा...., तुमचीही सकाळ याच गाण्याने सुरू होते? मग कुणी लिहिलंय माहितीये का? पाहा Video

Last Updated:

स्वच्छतेचा संदेश गाण्याच्या माध्यमातून देणारे महादेव जाधव हे सध्या पुणेकरांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. येवलेवाडी येथे राहणारे जाधव हे पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असून स्वच्छतेचे वारकरी म्हणून ओळखले जातात.

+
सफाई

सफाई कर्मचारी 

पुणे : शहर स्वच्छतेचा संदेश गाण्याच्या माध्यमातून देणारे महादेव जाधव हे सध्या पुणेकरांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. कचरा सुखा आणि गीला, सबने मिला कर डाला… गौर से सुनिये मेहरबान…अशा ओळींतून ते नागरिकांना ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन करतात. येवलेवाडी येथे राहणारे जाधव हे पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असून स्वच्छतेचे वारकरी म्हणून ओळखले जातात.
1994 साली महापालिकेत नोकरीला लागल्यानंतर त्यांनी आपल्या गायनाच्या आवडीला जनजागृतीचे माध्यम बनवले. 2003 मध्ये शहरात ओला-सुका कचरा वर्गीकरणाची संकल्पना सुरू झाली, तेव्हा अनेकांना त्याबद्दल माहिती नव्हती. त्या काळात तत्कालीन आयुक्तांनी स्वच्छ पुणे, सुंदर पुणे चा ध्यास घेतला. जाधव यांनीही या उपक्रमाला कलात्मक पाठबळ देत कचऱ्याविषयी खास गाणी तयार केली. घंटागाड्यांवरून सकाळी-सकाळी वाजणाऱ्या त्यांच्या गीतांमुळे वस्त्यांमध्ये जागरूकता वाढू लागली.
advertisement
कॅरी बॅग वेगळी ठेवा, ओला-सुका कचरा वेगळा करा आणि गाडीला द्या, असा साधा पण परिणामकारक संदेश त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला. रस्ते झाडताना, कचरा गाड्यांवर काम करताना ते गाणी गातात आणि नागरिकांशी थेट संवाद साधतात. जाधव यांच्या मते, सातत्यपूर्ण जनजागृतीमुळे आज सुमारे 90 टक्के नागरिक कचरा वेगळा देतात. परिसरानुसार ते गाण्यांचे शब्द बदलतात, त्यामुळे स्थानिकांना संदेश अधिक जवळचा वाटतो.
advertisement
जाधव यांनी महिला बचत गट, घरकाम करणाऱ्या महिला, श्रमिक संघटना, कामगारांचे प्रश्न अशा अनेक विषयांवर त्यांनी शाहिरी पद्धतीत आवाज उठवला. कामगार संघटनांच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेत, गाण्यांमधून संघटनांना बळकटी दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेत महापालिकेचे मुख्य कामगार सल्लागार अधिकारी नंदकुमार जगताप यांनी त्यांना शिघ्रकवी म्हणून गौरवले.
advertisement
स्वच्छता जनजागृतीसाठी मुख्य गायक कवी म्हणून निवड केली. त्यानंतर ते युनियनचे गायक कवी म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे घनकचरा विभागाचे सहआयुक्त यांच्या पुढाकाराने जाधव यांची महापालिकेचे ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
2019 मधील एक प्रसंग त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. पर्वती पायथा येथील कचरा पॉइंटवर एका महिलेने कचरा वेगळा देण्यास नकार देत उद्धट वर्तन केले. त्याच क्षणी जाधव यांनी तत्काळ गाण्याच्या ओळी रचून तिला आणि उपस्थितांना संदेश दिला. या घटनेनंतर त्यांच्या कार्याची अधिक दखल घेतली गेली.
advertisement
रात्रपाळीत 9 टन हॉटेल वेस्ट उचलण्यापासून ते पहाटे 6 वाजता झाडू हातात घेऊन प्रबोधन करण्यापर्यंत जाधव यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. नाचून-गाऊन लोकांना आनंद देत स्वच्छतेचा संदेश देत राहणार, असे ते सांगतात. एक साधा सफाई कर्मचारी गायक-कवी बनून शहरात स्वच्छतेची नवी चळवळ उभी करतोय, हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
ओला कचरा, सुका कचरा...., तुमचीही सकाळ याच गाण्याने सुरू होते? मग कुणी लिहिलंय माहितीये का? पाहा Video
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement