TRENDING:

Rishi Kapoor: 'मी तुला किस करणार नाही' ऐकून हादरले होते ऋषी कपूर, नेमकं काय घडलेलं?

Last Updated:

Rishi Kapoor: बॉलीवूडचे चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाणारे ऋषी कपूर लाखोंच्या हृदयावर राज्य करत होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बॉलीवूडचे चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाणारे ऋषी कपूर लाखोंच्या हृदयावर राज्य करत होते. 70-80 च्या दशकात जवळजवळ प्रत्येक तरुण त्यांच्या स्टाईलसारखा दिसायचा प्रयत्न करत होता, तर मुली त्यांच्या हास्यासाठी वेड्या होत्या. पडद्यावरचा हा रोमँटिक हिरो प्रत्यक्ष आयुष्यात साधा, कुटुंबप्रेमी आणि काही चुकीच्या सवयींनी ग्रासलेला होता. मात्र एका गोष्टीने त्यांचं आयुष्य बदललं.
ऋषी कपूर
ऋषी कपूर
advertisement

एक दिवस त्यांच्या आयुष्यात असं काही घडलं की त्यांनी स्वतःला बदललं. त्यांच्या आत्मचरित्रात “खुल्लम खुल्ला” मध्ये त्यांनी लिहिलं आहे की, त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर एकदा त्यांना म्हणाली, “तुझ्या तोंडाला वाईट वास येतो, म्हणून मी तुला सकाळी किस करणार नाही.” हे ऐकून ऋषी कपूर हादरले. त्यांना जाणवलं की त्यांच्या सवयीमुळे मुलीवर वाईट परिणाम होत आहे. आणि त्या दिवसापासून त्यांनी सिगारेटला हातही लावला नाही.

advertisement

मलायकाच्या कपड्यांवर सलमान-अरबाजचा होता आक्षेप, दबंग दिग्दर्शकाने सांगितलं काय घडलेलं?

व्यक्तिगत आयुष्यात ते पत्नी नीतू कपूर आणि मुलं रिद्धिमा व रणबीरसाठी कडक पण जबाबदार वडील होते. त्यांनी कबूल केलं होतं की ते रणबीरसोबत मित्रासारखं वागू शकले नाहीत, पण त्यांना खात्री होती की रणबीर आपल्या मुलांशी वेगळ्या पद्धतीने वागेल.

ऋषी कपूर हे राज कपूर यांचे सुपुत्र. लहानपणापासूनच त्यांना चित्रपटांची ओळख झाली. 1970 मध्ये “मेरा नाम जोकर”मध्ये बालकलाकार म्हणून त्यांनी काम केलं आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. पण 1973 चा बॉबी हा त्यांचा खरी स्टारडम मिळवून देणारा चित्रपट ठरला. 21 वर्षांच्या ऋषीने कॉलेज बॉयची भूमिका इतक्या सहजतेने साकारली की ते तात्काळ ‘रोमान्सचा पोस्टर बॉय’ बनले.

advertisement

यानंतर त्यांच्या कारकिर्दीत हिट चित्रपटांची रांगच लागली. “कर्ज”, “सरगम”, “प्रेम रोग”, “चांदनी”, “नगीना”, “नसीब”, “कुली”, “सागर”, “अमर अकबर अँथनी” आणि असे शेकडो चित्रपट. जवळपास 150 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. रोमँटिक हिरोच्या पलीकडे जाऊन त्यांनी “अग्निपथ”, “कपूर अँड सन्स”, “102 नॉट आउट”मध्ये गंभीर, खलनायक आणि विनोदी अशा सर्व भूमिका उत्तम निभावल्या.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Rishi Kapoor: 'मी तुला किस करणार नाही' ऐकून हादरले होते ऋषी कपूर, नेमकं काय घडलेलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल