मलायकाच्या कपड्यांवर सलमान-अरबाजचा होता आक्षेप, दबंग दिग्दर्शकाने सांगितलं काय घडलेलं?

Last Updated:

बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट ‘दबंग’ प्रदर्शित होऊन तब्बल 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. सलमान खानचा करिष्मा, चुलबुल पांडेची अदा, सोनाक्षी सिन्हाचा डेब्यू

मलायकाच्या कपड्यांवर सलमान-अरबाजचा होता आक्षेप
मलायकाच्या कपड्यांवर सलमान-अरबाजचा होता आक्षेप
मुंबई : बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट ‘दबंग’ प्रदर्शित होऊन तब्बल 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. सलमान खानचा करिष्मा, चुलबुल पांडेची अदा, सोनाक्षी सिन्हाचा डेब्यू आणि त्याहूनही जास्त चर्चा झाली  मलायका अरोराच्या ‘मुन्नी बदनाम हुई’ या गाण्याची. हे गाणं त्या काळात इतकं लोकप्रिय झालं की लग्नसमारंभ, पार्टी, डान्स फ्लोअर सर्वत्र केवळ "मुन्नी"ची धूम होती.
पण या गाण्याच्या मागे एक मनोरंजक किस्सा दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी अलीकडेच उघड केला आहे. त्यांनी सांगितलं की, त्या वेळी अरबाज खानला आपल्या पत्नी मलायकाने आयटम साँग करावं हे अजिबात पसंत नव्हतं. त्याला भीती होती की लोक मलायकाला "आयटम गर्ल" म्हणतील. एवढंच नव्हे तर सलमान खानलाही तिच्या कपड्यांबद्दल आक्षेप होता. अभिनवच्या म्हणण्यानुसार, "खान बंधू बाहेरून मोकळ्या स्वभावाचे वाटतात, पण ते रूढीवादी कुटुंबातून आले आहेत."
advertisement
मात्र, मलायका अरोरा ही स्वतःच्या निर्णयांवर ठाम असलेली महिला होती. तिने आत्मविश्वासाने हे गाणं स्वीकारलं. मलायकाने अरबाजला समजावलं की, "हे फक्त एक नृत्य आहे, यात काहीही चुकीचं नाही. प्रेक्षक आपलेच आहेत, मग घाबरण्यासारखं काय?” अखेरीस अरबाज मान्य झाला आणि गाणं शूट झालं. नंतर काय, हे गाणं एकामागून एक रेकॉर्ड तोडत गेलं आणि मलायका कायमची "मुन्नी" म्हणून चाहत्यांच्या मनात घर करून बसली.
advertisement
अभिनव कश्यप यांनी सांगितलं की गाण्याचं स्वरूप सुरुवातीला वेगळं होतं. मूळ प्लॅननुसार सलमान खान शेवटी गाण्यात प्रवेश करणार होता, पण सलमानला हे गाणं इतकं आवडलं की त्याने आग्रह धरला “मला यात लवकर एन्ट्री हवी!” अखेर दिग्दर्शकाने त्याचा हट्ट मान्य केला आणि गाण्यातील सगळं समीकरण बदललं.
मलायका याआधीच ‘छैयाँ छैयाँ’, ‘होंठ रसिले’ यांसारख्या डान्स नंबरमुळे लोकप्रिय होती, पण ‘मुन्नी बदनाम’ने तिचं करिअर एका वेगळ्या उंचीवर नेलं. अरबाज आणि मलायका यांचं लग्न 1998 मध्ये झालं होतं. त्यांचा मुलगा अरहान खानचा जन्म 2002 मध्ये झाला. मात्र 18 वर्षांनी, 2016 मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि 2017 मध्ये घटस्फोट घेतला. आजही दोघं एकत्र मुलाला वाढवत आहेत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
मलायकाच्या कपड्यांवर सलमान-अरबाजचा होता आक्षेप, दबंग दिग्दर्शकाने सांगितलं काय घडलेलं?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement