'नवरा माझा नवसाचा' फेम अभिनेता विकास समुद्रेनं नुकत्याच एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला. अभिजात मराठीशी बोलताना तो म्हणाला, "मी सचिन पिळगांवकरांबरोबर अदला बदली नावाचा सिनेमा केला होता. त्याकाळात माझी आई वारली होती त्यामुळे मी खूप दु:खी होतो. जुहूला एका बंगल्यात सिनेमाचं शूटिंग होतं. मी आत जाऊन बसलो होतो. तेव्हा अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर मला भेटायला आले. त्यांनी माझं सांत्वन केलं."
advertisement
"एक सीन होता त्यात अशोक मामा खाली झोपले होते. वरून कॅमेरा होता आणि मी त्यांना काही तरी विचारतोय. सचिन पिळगांवकर माझ्या बाजूला उभे आहेत. मी पिळगांवकरांना म्हटलं, बघा एवढा मोठा माणूस आहे तरी डाऊन टू अर्थ आहे. यावर ते दोघेही माझ्यावर इतके चिडले. म्हणाले, अरे तुझी परिस्थिती काय आणि तू कसले जोक करतोयस."
विकास समुद्रेनं आणकी एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, "एक सीन होता, त्या सिनेमात मी त्यांचा ऑल राऊंडर कॅरेक्टर होतो. मी त्यांच्यासमोर काही तरी आणून ठेवतो आणि म्हणतो हे घ्या स्प्रिंग अनियन, लागले तर सांगा आणखी आनियन ( आणेन ) त्यावर ते म्हणाले,अरे जा रे, याला हकला इथून. मी मामांना म्हटलं, मामा हे थोडीच शॉटमध्ये घेतलंय, मी असंच बोललो. ते म्हणाले, नको बोलूस तू काही."
"अशोक सराफ यांच्याबरोबर ती तीन सिनेमे केले. त्यांच्याकडून ज्या गोष्टी मिळाल्या त्या कुठेच मिळणार नाहीत. अशा छोट्या छोट्या गोष्टी मला मामांकडून ऐकायला मिळाल्या आणि मी त्या खूप आत्मसातही केल्या. ती माझी खूप मोठी पुंजी आहे असं मी समजतो", असंही विकासने सांगितलं.
