रिंकूच्या आई-बाबांनी का केलं दुसऱ्यांदा लग्न?
रिंकूची आई आशा राजगुरू यांनी सोशल मीडियावर दुसऱ्या लग्नाचे फोटे शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे. आता रिंकूच्या आई-बाबांनी दुसरं लग्न का केलं असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. याचं कारणही तितकंच खास आहे. रिंकूची आई आशा आणि वडील महादेव राजगुरू यांच्या लग्नाला 25वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या 25वर्षपूर्तीनिमित्तानं पुन्हा एकदा लग्न करण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. त्यामुळे रिंकूच्या आई-बाबांनीही दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
advertisement
( Rinku Rajguru: 'सैराट'नंतर रिंकू राजगुरुने केल्या इतक्या फिल्म; तुम्ही पाहिल्या की नाही?
रिंकूच्या आईने शेअर केले लग्नाचे फोटो
रिंकूची आई आशा यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर लग्नाच्या सेलिब्रेशनचे फोटो सर्वांबरोबर शेअर केलेत. लग्नाच्या 25व्या वाढदिवसाची काही क्षणचित्रे असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलं आहे. चाहत्यांनी दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खास म्हणजे आईच्या दुसऱ्या लग्नात रिंकू करवली झाली होती.निळी साडी नेसून रिंकू आई-वडिलांच्या लग्नात मिरवताना दिसली.
रिंकूचे चित्रपट
रिंकूच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झाल्यास रिंकूने सैराटनंतर अनेक मराठी चित्रपटात काम केलं. सैराटनंतर मेकअप, अनपॉज्ड आणि झिम्मा 2 सारख्या सिनेमात तिने काम केलं. रिंकू तिच्या आगामी प्रोजेक्टच्या शुटींगमध्ये बिझी आहे.