मुंबई : सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूला नुकताच तिच्या आशा या सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा राज्य पुरस्कार देण्यात आला. रिंकूनं पुरस्कार सोहळ्यातील तिचे काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता रिंकूनं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिनं अनकंडिशनल प्रेम या विषयावर भाष्य केलं आहे.
advertisement
रिंकू राजगुरूच्या आयुष्यात खऱ्या परशा कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष असतं. रिंकू सोशल मीडियावर सक्रीय असते. तिची प्रत्येक पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. रिंकूनं असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती तिच्या आवडत्या गोष्टी करताना दिसत आहे. ती अनकंडिशनल प्रेमासोबत खेळताना दिसतेय.
( मालिकेत अंडरकव्हर कॉप, खऱ्या आयुष्यातही पोलिसांशी खास कनेक्शन; 'तारिणी'ची रिअल लाइफ स्टोरी )
रिंकूनं हा व्हिडीओ शेअर करत लिहिलंय, "त्यांना कधीच एक शब्दही बोलला नाही. तरी मला त्यांनी निरपेक्ष प्रेमाची (UNCONDITIONAL LOVE) भाषा शिकवली."
रिंकूनं श्वानांच्या पिल्लांबरोबर खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. श्वानांची छोटी छोटी क्यूट पिल्ल रिंकूच्या भोवती घेरा मारून बसली आहेत. तर काही तिच्या अंगावर खेळत आहेत. रिंकू देखील त्यांच्याबरोबर खेळण्यात रमली आहेत. व्हिडीओमध्ये रिंकू गुपचूप उठते आणि निघून जाते तेव्हा ती सगळी पिल्लं तिच्या मागून येतात.
रिंकूच्या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. रिंकू प्राणी प्रेमी आहे हे यातून पाहायला मिळालं आहे. रिंकूच्या घरी एक पाळीव मांजर देखील आहे. रिंकूला प्राणी प्रचंड आवडतात असं तिनं एका मुलाखतीतही म्हटलं होतं. रिंकू तिच्या मांजरीचे अनेक फोटो तिच्या सोशल मीडियावरही शेअर करत असते.