TRENDING:

Zareen Khan : आधी मांजरीचा मृत्यू, नंतर अभिनेत्रीच्या आईचाही गेला जीव; सलमान खानच्या हिरोईनवर दु:खाचा डोंगर

Last Updated:

Zareen Khan Mother : अभिनेता सलमान खानसोबत डेब्यू करणारी ही अभिनेत्री जी एकाच्या जाण्याचं दु:ख पचवत नाही तो तिच्या आणखी एका जवळच्याने जगाचा निरोप घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी सलमान खानसोबत फिल्ममध्ये डेब्यू केलं. सलमान खानमुळे त्यांना इंडस्ट्रीत ओळख मिळाली, त्या हिरोईन बनल्या. अशीच सलमानची एक हिरोईन जिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
News18
News18
advertisement

अभिनेत्रीच्या पाळीव मांजरीचा 7 एप्रिल रोजी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूची बातमी तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी 8 एप्रिलला अभिनेत्रीच्या आईचाही मृत्यू झाला आहे.

advertisement

सलमानची ही अभिनेत्री आहे झरीन खान. जिच्या करिअरची सुरुवात 'फिर से रीस्टार्ट' या शॉर्टफिल्ममधून  झाली. त्यानंतर 2010 साली तिने वीर या फिल्मधून सलमान खानसोबत मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं.

advertisement

त्यानंतर तिने हाऊसफुल्ल 2, हेट स्टोरी 3 यासारख्या बॉलिवूड फिल्ममध्ये काम केलं. 2021 साली हम भी अकेले तुम भी अकेले फिल्ममध्ये ती शेवटची दिसली.

advertisement

झरीन खान कतरिना कैफसारखी दिसते, तिला कतरिनाची डुप्लिकेट म्हटलं गेलं. तिने हिंदीशिवाय पंजाबी, तामिळ आणि तेलुगु फिल्ममध्येही काम केलं आहे.

advertisement

झरीन खानची आई परवीन खानचं निधन झालं आहे. ती बऱ्याच कालावधीपासून आजारी होती. झरीन गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर तिच्या आईच्या प्रकृतीची माहिती देत होती आणि ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करा, असं आवाहन चाहत्यांना करत होती.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चंद्राचा कधीही न दिसणारा भाग, अचानक ब्लॅकआऊट अन् नासाचा संपर्क तुटला, 40 मिनिटांचा धरार, आर्टेमिस-2 मोहिमेत काय घडलं?
सर्व पहा

बुधवारी मुंबईत त्यांचं निधन झालं. झरीनच्या टीमने इन्स्टाग्रामवर एका निवेदनाद्वारे ही दुःखद बातमी दिली. झरीनच्या टिमने निवेदनात म्हटलं आहे की, अभिनेत्री झरीन खान आणि सना खान यांच्या आई परवीन खान यांचं 8 एप्रिल रोजी निधन झालं आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Zareen Khan : आधी मांजरीचा मृत्यू, नंतर अभिनेत्रीच्या आईचाही गेला जीव; सलमान खानच्या हिरोईनवर दु:खाचा डोंगर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल