प्रसिद्ध दिग्दर्शक प्रल्हाद कक्कर, जे त्या काळी सलमान खानच्या शेजारी राहत होते, त्यांनी अलीकडे एका मुलाखतीत धक्कादायक खुलासे केले. ते म्हणाले की, "सलमानचे ऐश्वर्यावरील प्रेम हे वेड्यासारखं होतं. तो तिच्यावर खूप अधिकार गाजवत असे. तो इमारतीच्या प्रवेशद्वारात मोठा गोंधळ घालायचा. भिंतीवर आपले डोके आपटायचा. हे नाते संपण्याआधीच संपल्यासारखे झाले होते."
advertisement
क्लबमध्ये भेट, दारुच्या नशेत पडले प्रेमात; संजय कपूर-महीपची अशी सुरु झालेली लव्हस्टोरी
ऐश्वर्याच्या पालकांसाठी हा ब्रेकअप दिलासा होता, कारण त्यांना तिच्या सुरक्षेची चिंता होती. मात्र, या नात्याच्या तुटण्यामुळे ऐश्वर्याच्या भावनांवर आणि करिअरवर खोल परिणाम झाला. इंडस्ट्रीतील अनेकांनी सलमानची बाजू घेतली, पण ऐश्वर्याला कुणी साथ दिली नाही. त्यामुळे तिचा चित्रपटसृष्टीवरील विश्वास ढळला.
ब्रेकअपनंतर ऐश्वर्याचे नाव अभिनेता विवेक ओबेरॉय सोबत जोडले गेले. विवेकने तर एकदा पत्रकार परिषद घेऊन सलमानवर गंभीर आरोप केले होते. त्याने सांगितले होते की सलमानने त्याला धमक्या दिल्या आणि शिवीगाळ केली. या घटनेनंतर ऐश्वर्याने मात्र कधीही स्वतःहून बोलणे पसंत केले नाही.
आज ऐश्वर्या राय बच्चन एक आदर्श पत्नी आणि आई म्हणून ओळखली जाते. तिने अभिषेक बच्चनसोबत लग्न करून आपले आयुष्य नव्या वाटेवर नेले. मात्र, सलमान-ऐश्वर्याची ही प्रेमकहाणी अजूनही बॉलिवूडमधील सर्वात गाजलेल्या कहाण्यांपैकी एक आहे.