संतोष जुवेकरने घेतली लग्जरी कार
नवीन वर्षाच्या तिसऱ्याच दिवशी संतोषने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. संतोषने लोकप्रिय असलेली 'थार रॉक्स' (Thar Roxx) ही एसयुव्ही गाडी खरेदी केली आहे. आनंद गगनात मावेनासा झालेल्या संतोषने कॅप्शनमध्ये आपल्या भावना मोकळेपणाने मांडल्या आहेत.
डोळे फिरले, थयथय नाचली... देवीच्या भजनात बेभान झाली अभिनेत्री, 5 लोकांनाही आवरेना, VIDEO VIRAL
advertisement
त्याने लिहिलं आहे, "देखोना Guysss देखोना... आईबाबा आणि साईबाबांच्या आशीर्वादाने, तसंच तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे आणि शुभेच्छांमुळे या नवीन वर्षात नवीन पेटीपॅक गाडी घेतली रे महाराजा! आता प्रवासही नव्याने सुरू! चांगभलं! बाप्पा मोरया..." संतोषचा हा उत्साहपूर्ण अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
गाडीची किंमत आणि वैशिष्ट्ये
संतोषने घेतलेली 'थार रॉक्स' ही गाडी सध्या मार्केटमध्ये तुफान चर्चेत आहे. माहितीनुसार, या गाडीची एक्स-शोरूम किंमत साधारणपणे १२.९९ लाख रुपयांपासून सुरू होऊन २३.०९ लाख रुपयांपर्यंत जाते. पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असलेली ही गाडी तिच्या ऑफ-रोडिंग क्षमतेसाठी ओळखली जाते. संतोषच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा असाच हा रांगडा चॉईस असल्याच्या कमेंट्स सध्या सोशल मीडियावर येत आहेत.
'छावा'मधील कामगिरीनंतर संतोषचा जलवा
गेल्या वर्षभरात संतोष जुवेकर सातत्याने चर्चेत राहिला आहे. २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक 'छावा' चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. सध्या तो 'घाशीराम कोतवाल' या हिंदी नाटकातून रंगभूमी गाजवत आहे. 'मोरया', 'झेंडा' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर आता 'स्मार्ट सुनबाई' मधूनही त्याने प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. कामातील याच यशाचं फळ म्हणून त्याने हे नवीन स्वप्न पूर्ण केलं आहे.
सेलेब्सकडून अभिनंदनाचा वर्षाव
संतोषने पोस्ट शेअर करताच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी त्याचं कौतुक केलं. संतोषला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं, पण अशा टीकाकारांना आपल्या कामाने आणि प्रगतीने उत्तर देण्याची त्याची ही शैली चाहत्यांना पुन्हा एकदा भावली आहे.
