45 सेकंदांच्या टीझरची सुरुवात 'इट्स टाइम टू रॉर' या वाक्यानं होतेय. बर्फाळ दऱ्यांमध्ये कॅमेऱ्याकडे पाठमोरा शाहरुख खान दिसतो. त्यानंतर काचेच्या छताला तोडून शाहरुख खानची दमदार एन्ट्री होते. रक्ताने माखलेले 'किंग' हे टायटल दिसतं आणि 24.12.2026 ही रिलीज डेट दिसते.
advertisement
डर नही दहशत म्हणत शाहरुख खान कोणाला तरी मुक्का मारतो. त्याचा चेहरा रक्ताने माखलेला आहे. रिलीज तारखेच्या घोषणेचा टीझर शेअर करताना शाहरुखने लिहिले, "किंग गर्जना करायला तयार आहे. 24.12.2026 पासून थिएटरमध्ये." #It'sKingTime #KingDateAnnouncement . 'किंग' चे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. सिद्धार्थ आणि शाहरुख खान यांचा हा दुसरा सिनेमा आहे. त्यांनी यापूर्वी 'पठाण' मध्ये एकत्र काम केले होते.
शाहरुखचा किंग 2026 च्या ख्रिसमसला रिलीज होईल. हा सिनेमा 4 डिसेंबर रोजी रिलीज होऊ शकला असता, परंतु नितेश तिवारी यांच्या 'रामायण' मुळे तो ख्रिसमसला ढकलण्यात आला आहे. रामायण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालू शकतो. रामायण हा सिनेमा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होऊ शकतो. दोन्ही सिनेमांच्या रिलीजमध्ये जवळपास 40 दिवसांचं अंतर आहे.
'किंग' सिनेमाची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स यांनी केली आहे. या सिनेमातून शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान पहिल्यांदाच ऑनस्क्रिन दिसणार आहे. सिनेमात दीपिका पदुकोण, अनिल कपूर, राणी मुखर्जी, अर्शद वारसी, अभय वर्मा आणि राघव जुयाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
सिनेमाचा टीझर शेअर करत शाहरुखचा मुलगा आर्यन खान याने एका शब्दांत रिअँक्शन देत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. शाहरुखने इन्स्टाग्रामवर किंगचा टीझर शेअर करत कॅप्शनमध्ये 'बाप' असं लिहिलं आहे. आर्यनची ही बाप कमेंट चांगलीच चर्चेत आली आहे.
