पण, त्या त्यांच्या कामासाठी किती समर्पित होत्या, हे त्यांचे पती, निर्माता बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. यावेळी त्यांनी श्रीदेवी यांच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासेही केले आहेत.
advertisement
निर्माता बोनी कपूर यांनी नुकतीच प्रसिद्ध समीक्षक कोमल नहाटाच्या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यात त्यांनी ‘मॉम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक खूपच खास किस्सा सांगितला.
बोनी कपूर म्हणाले, “या चित्रपटाचं शूटिंग आम्ही बहुतेक नोएडा आणि नंतर जॉर्जियामध्ये केलं. पण, त्या काळात मी आणि श्रीदेवी कधीही एका खोलीत एकत्र राहिलो नाही.”
हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. पण, बोनी कपूरनी लगेच त्यामागचं कारण सांगितलं. ते म्हणाले, “तिने मला सांगितलं होतं की, मला माझ्या पात्रापासून विचलित व्हायचं नाहीये. ती तिच्या भूमिकेत इतकी रमून गेली होती की, तिला खऱ्या आयुष्यातील पत्नीच्या भूमिकेचा तिच्या पात्रावर कोणताही परिणाम होऊ द्यायचा नव्हता.”
‘मॉम’ हा श्रीदेवींच्या करिअरमधील एक खूपच महत्त्वाचा चित्रपट आहे. यात त्यांनी एका आईची भूमिका केली होती. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
श्रीदेवीने या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत आणि त्या भूमिकेशी असलेलं तिचं नातं बोनी कपूरच्या या वक्तव्यातून दिसून आलं आहे. हेच कारण होतं की, 'मॉम' हा चित्रपट इतका प्रभावी ठरला.