TRENDING:

'हे अविश्वसनीय...' मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं मांडलं मत

Last Updated:

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं सध्या सगळीकडे कौतुक होत आहे, तर काही जण त्यावर टीका देखील करत आहेत. अशातच आता या योजनेवर अनेक बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मत व्यक्त केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सध्या राज्यात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'ची जोरदार चर्चा सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात प्रति महिना 1500 रुपये जमा होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच दोन महिन्यांचे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं सध्या सगळीकडे कौतुक होत आहे, तर काही जण त्यावर टीका देखील करत आहेत. अशातच आता या योजनेवर अनेक बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मत व्यक्त केलं आहे.
शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी
advertisement

अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'मु्ख्यमंत्री लाडकी बहीण योजने'चं कौतुक केलं आहे. राज्य सरकारचा निर्णय हा राज्यातील महिलांना दिलासा देणारे असल्याचे शिल्पा शेट्टीने म्हटले आहे. शिल्पा शेट्टीनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वी होताना पाहणं हे अविश्वसनीय आहे.'

'मला बाळ झालं तर...' भयानक मृत्यूआधी प्रेग्नेंट होती दिव्या भारती? या अभिनेत्रीजवळ केलेला बाळाविषयी खुलासा

advertisement

ती पुढे म्हणाली, 'महाराष्ट्रातील 1.5 कोटींहून अधिक महिलांना या योजनेमुळे आता दर महिन्याला मोठा आधार मिळणार आहे. अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे हे आनंददायक आहे. महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने ही एक मोठी झेप आहे. या उपक्रमाबद्दल राज्य सरकारचं अभिनंदन!' असं मत शिल्पाने व्यक्त केलं आहे.

advertisement

आतापर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून आतापर्यंत सरकारने या योजनेच्या नियमांत अनेक बदल केले आहेत. दरम्यान, नुकतेच सरकारने या योजनेच्या नियमात अनेक महत्वाचे बदल केले आहेत. यातील एका प्रमुख बदलाचा राज्यातील लाखो महिलांना फायदा होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'हे अविश्वसनीय...' मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं मांडलं मत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल