अनेक मराठी कलाकार हे अभिनयाबरोबरच अनेक गोष्टी करताना दिसतात. अभिनेत्री सई ताम्हणकर पॅराग्लाइडिंगचं शिक्षण घेताना दिसली होती. अनेक अभिनेत्री ट्रेकिंगला जातात. अशीच ही मराठी अभिनेत्री जी बुलेटला किक मारून थेट बाइक राइड ला निघाली आहे.
( Sonali Kulkarni : फक्त दोनच डायलॉग अन्... संजय दत्तसोबतचा बेडरूम सीन, घाबरली होती सोनाली कुलकर्णी )
advertisement
"मी अजूनही ती हवा फिल करतेय. त्या स्वच्छ हवेचा सुगंध अजूनही दरवळतोय. मन शांत आहे, सगळे आवाज जणू म्यूट झालेत. काय अप्रतिम सफर होती ती…!!! चिअर्स गर्ल… एक शिट्टी मार, पुढची राइड लगेच करूया, लव्ह", असं म्हणत अभिनेत्रीनं तिच्या बाइक राइडचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
बुलेटवर बाइक राइड करणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सोनाली कुलकर्णी आहे. सोनालीनं तिच्या इन्स्टाग्रामला राइडिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. राइड जॅकेट्स, बाइकला लगेज बांधून सोनाली बाइक राइडला निघाली. निसर्गाचा मनमुराद आनंद घेत सोनालीनं ही बाइक राइड पूर्ण केली. ती प्रचंड खुश दिसली.
सोनालीचं हे अडव्हेंचर पाहून चाहत्यांनी तिचं खूप कौतुक केलं आहे. तू ग्रेट आहेत, जबरदस्त, कमाल, दबंग मैत्रीण, माय रॉकस्टार असं म्हणत चाहत्यांनी सोनालीचं कौतुक केलं आहे. एकंदरीत 51 वर्षांच्या सोनालीसमोर बॉलिवूडची मलायका देखील फिकी पडली आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, तिला हॅलो नॉक नॉक कौन है हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. सोनालीचे अनेक प्रोजेक्ट पाइललाइनमध्ये आहेत. सोनाली फक्त बाइक राइडिंग करत नाही तर लायकलिंगही करत असते. बाइक राइडिंग आणि सायकलिंगचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
