सेंट्रल रेल्वेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सोनाली कुलकर्णी म्हणतेय,"नमस्कार...तुम्हा सर्वांना ठाऊक असेल मला भारतीय रेल्वे आवडते. मी भारतीय रेलची प्रचंड मोठी फॅन आहे. आता मी सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये आहे. खूप रात्र झाली आहे. वेळ वाचवण्यासाठी रेल्वेने आम्ही सोलापूरहून मुंबईला निघालो आहोत. आम्हाला खूप छान वाटतंय. माझे टीम मेंबर्सही माझ्यासोबत आहेत. ट्रेनमध्ये माझी जागा मी पकडली आहे. खूप दिवसांनी मी ट्रेनने प्रवास करत आहे. कावेरीला घेऊन न आल्याचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटतंय. या प्रवासासाठी मला शुभेच्छा द्या. भारतीय रेल जिंदाबाद".
advertisement
'दुबई मार्गे ठाण्याला येणं सोपं', तुला जपणार आहे फेम अभिनेता असं का म्हणाला?
"अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने वेळ वाचवण्यासाठी भारतीय रेल्वे सेवा वापरली. सोलापूर ते मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असताना तिने आपला अनुभव शेअर केला आहे. भारतीय रेल्वे सदैव तुमच्या सेवेत", असं कॅप्शन देत सेंट्रल रेल्वेने सोनालीचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोनालीच्या या व्हिडीओवर खूप छान, रेल्वेने प्रवास करणं कधाही फायदेशीर, प्रवासासाठी शुभेच्छा, अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. अभिनेत्रीने 'झुक झुक झुक झुक', म्हणत रेल्वे प्रवासादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
सोनालीला वाटली 'या' गोष्टीची भीती
सोनालीने रेल्वेतील आणखी एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री म्हणतेय,"खूपच छान. मी आता सेटल झाले आहे. पहाटे माझं स्टेशन येणार आहे. तर जाग येईल की नाही, याची मला खूप भीती वाटतेय. त्यामुळे आता आम्ही सगळे गजर लावून ट्रेनमध्ये झोपणार आहोत".
सोनाली कुलकर्णीची 'द ट्रायल' ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल. हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील एक अभ्यासू अभिनेत्री म्हणून सोनालीकडे पाहिलं जातं. चित्रपट, मालिका, रुपेरी पडदा ते ओटीटी विश्व सर्वच ठिकाणी सोनालीच्या दमदार अभिनयाची झलक पाहायला मिळत असते. आता अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.