सस्पेन्स कायम!
‘कांतारा चॅप्टर १’ चा ट्रेलर खूपच रहस्यमय आहे. निर्मात्यांनी ट्रेलरमध्ये कथेबद्दल जास्त माहिती दिली नाही, ज्यामुळे चित्रपटातील सस्पेन्स कायम राहिला आहे. यात भव्य दृश्यं आणि दमदार संगीत आहे, पण कथा काय आहे, हे मात्र कळत नाही. ‘कांतारा’च्या टीमने सोशल मीडियावर ट्रेलरची मोठी घोषणा केली. पण, या घोषणेमध्ये त्यांनी अभिनेता हृतिक रोशनला टॅग केलं. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, ‘कांतारा चॅप्टर १’ मध्ये हृतिक रोशन दिसणार आहे का?
advertisement
दिल्लीत मोहनलालचा गौरव, केरळमध्ये डायरेक्टरच्या घरावर छापा, मित्राचा मुलगाही अडणीत, काय आहे प्रकरण?
याआधीही ‘कांतारा’ मध्ये हृतिक दिसणार असल्याची चर्चा होती, पण नंतर ती अफवा असल्याचं समोर आलं होतं. आता पुन्हा एकदा हा टॅग पाहिल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे. पण, निर्मात्यांनी याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे हृतिक रोशन या चित्रपटात असेल की नाही, हे पाहण्यासाठी सगळ्यांना प्रतीक्षा करावी लागेल.
‘कांतारा चॅप्टर १’ मध्ये संगीत दिग्दर्शक बी. अजनीश लोकनाथ आणि छायांकनकार अरविंद कश्यप यांनी काम केलं आहे. हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक ठरेल अशी अपेक्षा आहे.