संगीताचे धक्कादायक आरोप
विजय आणि संगीता यांनी आजवर आपलं खासगी आयुष्य नेहमीच पडद्याआड ठेवलं होतं. मात्र, घटस्फोटाच्या अर्जात संगीताने विजयवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, विजयचे सिनेसृष्टीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा दावा संगीताने केला आहे. एका 'आदर्श फॅमिली मॅन'ची प्रतिमा असलेल्या विजयसाठी हा आरोप त्याच्या सार्वजनिक प्रतिमेला मोठा धक्का देणारा ठरू शकतो.
advertisement
दोन वर्षांपासून राहत होते वेगळे
घटस्फोटाचा हा निर्णय अचानक घेतलेला नाही, असं अर्जातील माहितीवरून स्पष्ट होतंय. विजय आणि संगीता गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांपासून वेगळे राहत असल्याचे समोर आले आहे. दीर्घकाळ चाललेला हा दुरावा आता कायदेशीर लढाईत रूपांतरित झाला असून, दोघांमधील संवाद पूर्णपणे संपल्याचे हे संकेत आहेत.
२० एप्रिलला होणार पहिली सुनावणी!
चेंगलपट्टू कौटुंबिक कल्याण न्यायालयात या प्रकरणाची पहिली सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे. न्यायालय सुरुवातीला तडजोडीचा प्रयत्न करेल की हे प्रकरण थेट घटस्फोटाकडे वळेल, याकडे तमिळनाडूच्या जनतेचे लक्ष लागले आहे. संगीता ही मूळची श्रीलंकन तमिळ असून, ती विजयची चाहती होती. १९९९ मध्ये या दोघांचे लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुले (जॅसन संजय आणि दिव्या साशा) आहेत.
राजकीय भवितव्यावर काय परिणाम होणार?
विजयने नुकताच राजकारणात प्रवेश केला असून २०२६ च्या विधानसभा निवडणुकांसाठी तो सज्ज झाला आहे. अशा वेळी वैयक्तिक आयुष्यातील हा वाद त्याच्या राजकीय प्रतिमेवर परिणाम करू शकतो. विरोधकांकडून या मुद्द्याचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण सार्वजनिक आयुष्यात विश्वासार्हतेला मोठे महत्त्व असते.
