TRENDING:

फोटोत दिसणारी चिमुकली होती बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री; तयार व्हायला बाथरूममध्ये गेली अन् पाण्यात बुडून झाला मृत्यू

Last Updated:

एवढंच नाही तर चित्रपटासाठी 1 कोटी फी घेणारी ती पहिलीच अभिनेत्री होती. पण अचानक एका रात्री या सुपरस्टारच्या निधनाची बातमी आली आणि चाहत्यांना धक्काच बसला. या अभिनेत्रीची आज पुण्यतिथी आहे. जाणून घेऊया तिच्याविषयी काही रंजक गोष्टी.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार्स होते ज्यांनी रातोरात प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि अचानक या जगातून एक्झिट घेतली. त्यांचं जाणं चाहत्यांना चटका लावून गेलं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीविषयी सांगणार आहोत, जिने आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर अनेक वर्ष बॉलिवूडवर राज्य केलं होतं. या अभिनेत्रीची लेडी अमिताभ बच्चन अशी ओळख होती. एवढंच नाही तर चित्रपटासाठी 1 कोटी फी घेणारी ती पहिलीच अभिनेत्री होती. पण अचानक एका रात्री या सुपरस्टारच्या निधनाची बातमी आली आणि चाहत्यांना धक्काच बसला. या अभिनेत्रीची आज पुण्यतिथी आहे. जाणून घेऊया तिच्याविषयी काही रंजक गोष्टी.
ओळखा पाहू कोण?
ओळखा पाहू कोण?
advertisement

फोटोत दिसणारी ही लहान मुलगी दुसरी कोणी नसून बॉलिवूडची लेडी सुपरस्टार श्रीदेवी आहे. सदमा, मिस्टर इंडिया, खुदा गवाह, चालबाज, चांदनी यासारख्या बॉलिवूड चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण साकारात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी, अभिनय आणि नृत्य कौशल्याचा मिलाफ असलेली चित्रपटसृष्टीतली पहिली महिला सुपरस्टार म्हणून अभिनेत्री श्रीदेवी यांची ओळख आहे. रजनीकांत ते कमल हासन यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करत श्रीदेवी यांनी आपलं स्थान मिळवलं होतं.

advertisement

'हे' दोन सिनेमे नाकारणं माझी मोठी चूक, शत्रुघ्न सिन्हांना होतो आजही पश्चात्ताप

श्रीदेवी म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते सौंदर्य आणि अजरामर भूमिका. दमदार अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं. त्यामुळे आजही श्रीदेवी यांची लोकप्रियता कायम आहे. एकेकाळी जेव्हा सिनेसृष्टीत अभिनेत्रींना समानतेची वागणूक दिली जात नाही असा बोलबाला असताना निर्मात्यांनी श्रीदेवीना चित्रपटात घेण्यासाठी 1 कोटी रुपये मोजले होते. q कोटी रुपये फी घेणारी श्रीदेवी पहिली अभिनेत्री होती. श्रीदेवी ही बॉलिवूड अभिनेत्री मानली जात होती की तिला साइन करण्यासाठी मोठे दिग्दर्शक तिच्या घराबाहेर रांगेत उभे असत. इतकंच नाही तर, दिग्दर्शक त्यांना त्यांच्या चित्रपटात कास्ट करण्यासाठी नायकापेक्षा जास्त पैसे द्यायला तयार असायचे.

advertisement

श्रीदेवी भाचा मोहित मारवाह याच्या विवाह सोहळ्यासाठी दुबईमध्ये गेल्या होत्या. मात्र याचदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, श्रीदेवींचा मृत्यू हार्ट अ‍ॅटॅकमुळे झाल्याचं सांगण्यात आल. मात्र शवविच्छेदनानंतर बाथटबमधील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. मात्र तत्पूर्वी त्यांच्या मृत्यूच्या कारणांबाबत अनेक तर्कवितर्क करण्यात आले होते. श्रीदेवी यांची हत्या झाल्याचं काही जणांनी म्हटलं तर काहींनी हार्ट अ‍ॅटॅकमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं. आजही श्रीदेवीचे चित्रपट, त्यातील तिचा अभिनय, नृत्य प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
फोटोत दिसणारी चिमुकली होती बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री; तयार व्हायला बाथरूममध्ये गेली अन् पाण्यात बुडून झाला मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल