मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील करूर इथं थलपति अभिनेता विजय यांच्या रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीत तुफान अशी गर्दी झाली होती. अभिनेता विजय हे एका व्हॅनवर उभा राहून रॅलीत सामील झाले होते. रस्त्यावरून रॅली जात असताना ते भाषण करत होते. त्याच दरम्यान एक मुलगा हरवला असल्याची माहिती समोर आली. त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ही माहिती दिली. विजय यांनी माईकवरून एक मुलगा हरवला आहे, तो शोधण्यासाठी मदत करा. पोलिसांना सहकार्य करा अशी सुचना कार्यकर्त्यांनी दिली आणि स्टेजवरून खाली उतरले. त्यानंतर एकच गर्दी उसळली. गुदमरून अनेक जण बेशुद्ध पडले. तर काही जण गर्दीत दबले गेले. अचानक झालेल्या या घटनेत ३१ जणांचा मृत्यू झाला असल्याचंस मोर आलं. यामध्ये मुलं आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसह अनेक लोक बेशुद्ध पडले.
advertisement
वृत्तानुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या विजयने परिस्थिती पाहून लगेचच आपलं भाषण थांबवलं आणि स्टेजवरून पाण्याच्या बाटल्या गर्दीकडे फेकून मदत करण्याचा प्रयत्न केला. गर्दीतून जाण्यासाठी रुग्णवाहिकांना बरीच अडचण आली. बेशुद्ध झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितलं जात आहे.
विजयच्या रॅलीमध्ये मोठा जमाव
तामिळनाडू वेत्री कळघम (TVK) चे प्रमुख विजय यांच्या नमक्कल आणि करूर येथील निवडणूक रॅलींना मोठी गर्दी झाली होती. विजय यांनी रॅलींदरम्यान द्रमुक आणि एआयएडीएमकेवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, त्यांचा पक्ष भाजपशी युती करणार नाही आणि खोटी आश्वासनं देणार नाही. रस्ते, आरोग्यसेवा, स्वच्छ पाणी आणि सुरक्षा यासारख्या मूलभूत सुविधा देण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. '२०२६ मध्ये खरी लढत द्रमुक आणि टीव्हीके यांच्यात होईल, जिथे भ्रष्ट प्रशासनाविरुद्ध जनतेची शक्ती लढवली जाईल. त्यांनी जाहीर केलं की ते दर शनिवारी राज्यातील विधानसभा मतदारसंघांना भेट देतील, असं यावेळी विजय म्हणाले होते.
करूर अपघातावर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी करूर घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट केलं की, त्यांनी माजी मंत्री व्ही. सेंथिलबालाजी, आरोग्य मंत्री मा. सुब्रमण्यम आणि जिल्हाधिकाऱ्यांना बेशुद्ध पडलेल्या आणि रुग्णालयात दाखल झालेल्यांना त्वरित उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी तिरुचिरापल्लीचे मंत्री अनबिल महेश यांना मदत कार्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश देखील दिले. मुख्यमंत्र्यांनी एडीजीपींना परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी जलद कारवाई करण्यास सांगितलं. त्यांनी जनतेला डॉक्टर आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केलंय.