या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे परिसरातील रस्ते अक्षरशः पाण्याखाली गेले आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. लहान मुलं, वृद्ध नागरिक तसेच महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. काही घरांमधील तर काही दुकानांमधील सामान देखील भिजून खराब झाले आहे.
Weather Alert : महाराष्ट्रात पुढील 24 तासांत धो-धो पाऊस, 5 जिल्ह्यांना रेड तर 26 साठी यलो अलर्ट
advertisement
बीड शहरातील धांडे नगर परिसरात बिंदुसरा नदीपात्रात वाढलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्र भरून वाहू लागले असून याचा थेट परिणाम धांडे नगर परिसरावर झाला आहे. सर्वत्र पाणीच पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे परिसरातील रस्ते अक्षरशः पाण्याखाली गेले आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. लहान मुलं, वृद्ध नागरिक तसेच महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. काही घरांमधील तर काही दुकानांमधील सामान देखील भिजून खराब झाले आहे.
परिसरातील व्यावसायिकांनाही या पाण्याचा फटका बसला आहे. दुकाने आणि गाळ्यांमध्ये पाणी घुसल्याने व्यापार ठप्प झाला आहे. दैनंदिन गरजांची खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या भागातील वाहतूकही ठप्प झाली असून काही ठिकाणी दुचाकी आणि इतर वाहने पाण्यात अडकलेली दिसून आली आहेत.
स्थानिक प्रशासनाने या परिस्थितीवर लक्ष ठेवले असून पाण्याचा प्रवाह आणखी वाढल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचा इशारा दिला आहे. मदतकार्य सुरू करण्यासाठी पथक तयार ठेवण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच नागरिकांना नदीकाठच्या परिसरात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या बिंदुसरा नदीतील पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धांडे नगर भाग धोक्याच्या विळख्यात आहे. पाणी ओसरण्यास वेळ लागणार असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने मात्र परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतल्याचे स्पष्ट केले आहे.