भल्या पहाटे आले, बेडरूमला कडी घातली अन्..., चोरट्यांचं धक्कादायक कांड, बीडमध्ये खळबळ
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Beed News: सकाळी घराच्या कड्या बाहेरून लावलेल्या दिसल्याने पवार यांना संशय आला. घरात प्रवेश केल्यानंतर सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले.
बीड: गेल्या काही काळात बीडमध्ये गुन्हेगारी घटना वाढल्याचे चित्र आहे. अशातच माजलगाव तालुक्यातील लऊळ येथे घरफोडीच्या घटनेने खळबळ उडाली. 15 जानेवारी रोजी पहाटे सुमारे पाच वाजता अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घरात घुसखोरी करून तब्बल 11 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण आहे.
लऊळ येथील शेतकरी संदीप लिंबाजी पवार हे 14 जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे दैनंदिन कामे आटोपून रात्री साडेनऊच्या सुमारास घराशेजारील त्यांच्या निवासस्थानी झोपले होते. मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या छतावरून अंगणात उतरून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूमच्या कड्या बाहेरून बंद करून बाजूच्या खोलीतील कपाट फोडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
advertisement
कपाटातील लॉकर तोडून चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात मौल्यवान दागिने लंपास केले. यात सोन्याचे एकूण साडेअकरा तोळे दागिने, विविध नेकलेस, गंठण, चैन, झुंबर, बाळी तसेच चांदीचे करंडे व बाजूबंद यांचा समावेश आहे. दागिन्यांचे एकूण वजन आणि किंमत लक्षात घेता ही घरफोडी सुनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सकाळी घराच्या कड्या बाहेरून लावलेल्या दिसल्याने पवार यांना संशय आला. घरात प्रवेश केल्यानंतर कपाट उघडे व सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. त्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
advertisement
संदीप पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बालक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक सक्रिय केले आहे. या घटनेमुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 1:14 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
भल्या पहाटे आले, बेडरूमला कडी घातली अन्..., चोरट्यांचं धक्कादायक कांड, बीडमध्ये खळबळ










