सगळी स्वप्नं होणार पूर्ण! उद्या 'या' 4 राशीच्या लोकांना लागणार लॉटरी, कोणाचं नशीब चमकणार?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात जेव्हा एकाच राशीत ग्रहांची युती होते, तेव्हा अनेक प्रकारचे राजयोग निर्माण होतात. येत्या 17 जानेवारी 2026 रोजी असाच एक अत्यंत शुभ आणि दुर्मिळ मानला जाणारा 'लक्ष्मी नारायण राजयोग' निर्माण होत आहे.
Lakshami Narayan Rajyog 2026 : ज्योतिषशास्त्रात जेव्हा एकाच राशीत ग्रहांची युती होते, तेव्हा अनेक प्रकारचे राजयोग निर्माण होतात. येत्या 17 जानेवारी 2026 रोजी असाच एक अत्यंत शुभ आणि दुर्मिळ मानला जाणारा 'लक्ष्मी नारायण राजयोग' निर्माण होत आहे. तब्बल 46 महिन्यांनंतर मकर राशीत बुध आणि शुक्र एकत्र येत असल्याने हा योग जुळून आला आहे. अंकशास्त्र आणि ज्योतिषानुसार, हा योग धन, ऐश्वर्य, सुख-समृद्धी आणि करिअरमध्ये मोठी भरभराट देणारा मानला जातो. जाणून घेऊया की उद्यापासून कोणत्या 4 राशींचे नशीब पालटणार आहे.
कसा तयार होतो 'लक्ष्मी नारायण राजयोग'?
जेव्हा 'बुद्धीचा कारक' बुध आणि 'ऐश्वर्याचा कारक' शुक्र एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा लक्ष्मी नारायण योग तयार होतो. 13 जानेवारीला शुक्राने मकर राशीत प्रवेश केला असून, उद्या 17 जानेवारीला बुध देखील मकर राशीत प्रवेश करेल. या दोन ग्रहांच्या युतीमुळे हा शक्तिशाली राजयोग सक्रिय होणार आहे.
advertisement
या 4 राशींना मिळणार सुवर्णसंधी
वृषभ
नशिबाची पूर्ण साथ वृषभ राशीच्या लोकांसाठी हा राजयोग त्यांच्या भाग्यस्थानी तयार होत आहे. तुमचे नशीब प्रचंड बलवान राहील. रखडलेली कामे नशिबाच्या जोरावर पूर्ण होतील. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा आर्थिक नफा मिळेल. कुटुंबासोबत धार्मिक सहलीचे योग आहेत.
कर्क
करिअर आणि व्यवसायात वृद्धी कर्क राशीच्या सातव्या स्थानात बुध-शुक्राची युती होत आहे. भागीदारीच्या व्यवसायात तुम्हाला मोठा लाभ होईल. वैवाहिक आयुष्यात गोडवा येईल. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. नोकरीत पगारवाढ किंवा पदोन्नतीची दाट शक्यता आहे.
advertisement
तूळ
सुख-सुविधांमध्ये वाढ तुमच्या राशीच्या चौथ्या स्थानी हा योग निर्माण होत असल्याने घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. भौतिक सुखसोयींवर खर्च होईल, जो तुम्हाला आनंद देईल. गुंतवणुकीतून भविष्यात मोठे परतावे मिळण्याचे संकेत आहेत.
मकर
व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल तुमच्याच राशीत हा राजयोग तयार होत आहे. विशेष म्हणजे येथे आधीच सूर्य, मंगळ आणि शुक्र असल्याने 'चतुर्ग्रही योग' देखील आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. समाजात तुमची मान-प्रतिष्ठा उंचावेल. राजकारण किंवा प्रशासकीय क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरेल. अचानक धनलाभाचे योग आहेत.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 1:13 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
सगळी स्वप्नं होणार पूर्ण! उद्या 'या' 4 राशीच्या लोकांना लागणार लॉटरी, कोणाचं नशीब चमकणार?










