प्रिया मराठेच्या अचानक निधनाने सर्वजण धक्क्यात आहेत. अशातच सुबोध भावेंनी आपली बहिण प्रियासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
प्रिया मराठेची शेवटची पोस्ट, नवरा शंतनूसोबत शेअर केले होते आनंदाचे क्षण; पाहा PHOTOS
सुबोध भावे पोस्ट
" प्रिया मराठे "
एक उत्तम अभिनेत्री, काही मालिका आणि चित्रपटात माझी सहकलाकार. पण माझ्यासाठी त्याही पेक्षा महत्त्वाच नातं तिच्या बरोबर होतं. प्रिया माझी चुलत बहीण. या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहेनत,कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या.प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली. काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सर च निदान झालं. त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक, मालिका या मधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली. पण त्या कॅन्सर ने काही तिची पाठ सोडली नाही.
advertisement
सुबोध भावेंनी पुढे लिहिलं, "तू भेटशी नव्याने" या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला. या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार @shantanusmoghe भक्कम पणे तिच्याबरोबर होता. माझी बहीण लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली. प्रिया तूला भावपूर्ण श्रद्धांजली...तू जिथे असशील तिथे तुला शांतता लाभावी हीच प्रार्थना..ओम शांती.
दरम्यान, प्रिया सोशल मीडियावर कायम हसतमुख दिसायची. तिच्या इंस्टाग्रामवरील 11 ऑगस्टची शेवटची पोस्ट आजही चाहत्यांना भावूक करते. नवरा शंतनूसोबत जयपूर ट्रिपचे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना आनंद दिला होता. फोटोमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत होते. कोणाला ठाऊक होतं की हाच तिची शेवटचा पोस्ट ठरेल.