शोमधील सर्वात लाडका रोल म्हणजे दयाबेन. दयाबेनची भूमिका दिशा वकानीने साकारली होती. मात्र काही काळापासून अभिनेत्री शोमध्ये दिसत नाही. चाहते तिला खूप मिस करतात. पण दिशा सारखी दयाबेन दुसरं कोणी साकारु शकत नाही म्हणून आजही तो रोल रिकामाच आहे. या रोलसाठी दिशा वकानीचं कसं ऑडिशन झालं होतं याविषयी जाणून घेऊया.
advertisement
बॉसच्या लेकीवर जडला जीव, पहिल्या नजरेतच पडला प्रेमात, परेश रावलची फिल्मी लव्ह स्टोरी!
मालिकेचे निर्माता असित मोदी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, दिशा वकानीचा ऑडिशन अत्यंत प्रभावी होता. तिने 'दयाबेन'ची भूमिका इतक्या नैसर्गिकपणे साकारली की, संपूर्ण टीम तिच्या अभिनयावर मोहित झाली. तिच्या संवादफेकीतील खास गुजराती लहेजा आणि हावभावांनी पात्राला जीवंत केले. असित मोदी म्हणाले, "ती जेव्हा ऑडिशनमध्ये 'दयाबेन' झाली, तेव्हा आम्ही सर्वजण तिच्या अभिनयावर फिदा झालो."
दरम्यान, दिशा वकानीने 2018 मध्ये प्रेग्नंसी रजेवर गेल्यानंतर मालिकेतून ब्रेक घेतला. तिच्या अनुपस्थितीत, निर्मात्यांनी नवीन 'दयाबेन'च्या शोधासाठी ऑडिशन्स घेतल्या. असित मोदी यांनी अलीकडेच एका अभिनेत्रीच्या ऑडिशनवर समाधान व्यक्त केले असून, तिच्यासोबत मॉक शूट्स सुरू आहेत. तथापि, तिची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही.