TRENDING:

'भाऊचा धक्का'वर तन्वीचा तमाशा, सर्वांसमोरच आयुषला बेदम मारलं; रितेशच्या रिॲक्शने प्रेक्षकांचा पारा चढला, नक्की काय घडलं?

Last Updated:

Bigg Boss Marathi 6: ज्या तन्वी आणि आयुषच्या बाँडिंगचे व्हिडिओ व्हायरल व्हायचे, त्याच जोडीने आज रितेश भाऊंसमोर असा काही तमाशा केला की अख्खा महाराष्ट्र थक्क झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात सध्या जे काही घडतंय, ते पाहून प्रेक्षकांना काही कळेनासं झालं आहे. जिथे मैत्रीचे आणाभाका घेतले जायचे, तिथे आता वेगळंच गणित पाहायला मिळतंय. शनिवार-रविवार म्हणजे आठवड्याच्या हिशोबाचा दिवस, पण यावेळचा 'भाऊचा धक्का' केवळ शाब्दिक चकमकीपुरता मर्यादित राहिला नाही. ज्या तन्वी आणि आयुषच्या बाँडिंगचे व्हिडिओ व्हायरल व्हायचे, त्याच जोडीने आज रितेश भाऊंसमोर असा काही तमाशा केला की अख्खा महाराष्ट्र थक्क झाला.
News18
News18
advertisement

रितेश भाऊंनी घरातील साचलेला राग बाहेर काढण्यासाठी एक 'पंचिंग बॅग' टास्क दिला होता. ज्याचा राग येतोय, त्याचा फोटो लावून मनातील भडास काढायची होती. मात्र, तन्वीने जेव्हा आयुषचा फोटो लावला, तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या. तन्वी चिडून म्हणाली, "मी याला हजारवेळा सांगितलं की मला यात बेस्ट फ्रेंड दिसतोय, पण हा समजतच नाही. मी रडत असताना मला तुझा हात माझ्या खांद्यावर हवा असतो. तू माझ्या बाजूला हवा असतो. पण तू तेव्हा मला स्पेस देत असल्याचं सांगत दूर होतोस."

advertisement

सुरज चव्हाण ठरला 'भारतातील सर्वात देखणा पुरुष'? थेट जस्टिन बीबरशी तुलना, बिग बॉस विनर इंटरनेटवर ट्रेंडिंग

आयुषनेही तिथेच तिला उत्तर दिलं, "मला तुझं बोलणं पटतंय, पण मी तुझ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, हे मी आधीच सांगितलंय." हे ऐकताच तन्वीचा संयम सुटला. ती वेड्यासारखी पंचिंग बॅगवर तुटून पडली. तिला दुखापत होऊ नये म्हणून आयुष तिला थांबवायला गेला आणि तिथेच नको ते घडलं. संतापलेल्या तन्वीने आयुषलाच जोरात मारायला सुरूवात केली. भर सेटवर झालेली ही शारीरिक हिंसा पाहून रितेश भाऊ सुद्धा काही क्षण शॉक झाले.

advertisement

रितेश भाऊंची शांतता आणि प्रेक्षकांचा संताप

सगळ्यांना वाटलं होतं की तन्वी आता कडक शब्दात ओरडलं जाईल. पण रितेशने अत्यंत संयमी भूमिका घेत केवळ एका वाक्यात विषय संपवला. "तुमचं हे जे काही आहे, ते घराच्या आत सोडवा," असं म्हणत त्यांनी पुढच्या स्पर्धकाकडे मोर्चा वळवला. मात्र, सोशल मीडियावर तन्वीवर टीकेची झोड उठली आहे. "ही मैत्री नाही, तर तन्वीचा आयुषवरचा अतिरेकी हक्क आहे," अशा कमेंट्सचा पूर आला आहे.

advertisement

ओमकार राऊतचा पत्ता कट; थोडक्यात वाचला आयुष

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सुकट ते खारे मासे, पुण्यातील 95 वर्षे जुनं बोंबील मार्केट, खवय्यांचे आजही आवडते ठिकाण, Video
सर्व पहा

या 'धक्क्या'वर केवळ राडाच झाला नाही, तर घराला एक मोठा धक्काही बसला. या आठवड्यात डबल एलिमिनेशन झालं. शुक्रवारी दिव्या शिंदेला बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर, रविवारी ओमकार राऊतची एक्झिट झाली आहे. डेंजर झोनमध्ये आयुष आणि ओमकार समोरासमोर होते, पण प्रेक्षकांच्या कमी मतांमुळे ओमकारचा प्रवास संपला. गंमत म्हणजे, ज्या आयुषला तन्वीने काही वेळापूर्वी मारलं होतं, तो सेफ झाल्याचं कळताच तिने त्याला मिठी मारून ढसाढसा रडायला सुरुवात केली. तन्वीचं हे 'प्रेम' आहे की 'वेड', यावरून प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
'भाऊचा धक्का'वर तन्वीचा तमाशा, सर्वांसमोरच आयुषला बेदम मारलं; रितेशच्या रिॲक्शने प्रेक्षकांचा पारा चढला, नक्की काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल