नेटफ्लिक्सवर नुकतीच रिलीज झालेली ही सीरीज 7 एपिसोडची आहे. सोशल मीडियावर याचीच चर्चा पहायला मिळत आहे. रिलीज होताच टॉप ट्रेंडिंग लिस्टमध्ये ही सीरीज आली.
बाप, मुलगा आणि नातू... तिघेही सुपरस्टार; नेटवर्थ तब्बल 3,754 कोटींची
आपण बोलत असलेली ही सीरीज आहे, ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’. या सीरीजचा दिग्दर्शक आणि लेखक आहे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान. हीच त्याची पहिली मोठी एन्ट्री आहे आणि पदार्पणातच त्याने नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होण्याचा मोठा रेकॉर्ड केला आहे.
advertisement
ड्रामा, कॉमेडी, अॅक्शन आणि रोमान्स सर्वच या सीरीजमध्ये पाहायला मिळत आहे. या मालिकेतील आकर्षण म्हणजे स्टारकास्ट. यात लक्ष्य लालवानी, अन्या सिंग, राघव जुयाल, सेहर बंबा, मोना सिंग यांसारखे कलाकार आहेत. पण एवढंच नाही तर बॉबी देओल, करण जोहर, गौतमी कपूर, मनोज पाहवा यांसारखे अनुभवी कलाकारही या प्रवासात सामील झाले आहेत.
याशिवाय रणबीर कपूर, अर्जुन कपूर, राजकुमार राव, दिशा पटानी, सारा अली खान, इब्राहिम अली खान, इमरान हाश्मी यांसारख्या स्टार्सचे कॅमिओ रोल प्रेक्षकांना आणखी उत्सुक करून टाकतात. रेड चिलीज एंटरटेनमेंट निर्मित या मालिकेतून आर्यन खानने बॉलिवूडच्या चमकदार दुनियेचा वेगळा चेहरा दाखवला आहे. ग्लॅमर, स्पर्धा, मैत्री आणि धक्कादायक खुलासे सगळं काही एका पॅकेजमध्ये.
दरम्यान, 19 सप्टेंबर रोजी रिलीज झाल्यानंतर काही तासांतच ही मालिका नेटफ्लिक्सवर नंबर 1 वर पोहोचली. म्हणजेच, आर्यन खानने केलेला हा प्रयत्न प्रेक्षकांना पूर्णपणे भावला आहे.