TRENDING:

'द केरला स्टोरी २' वादाच्या भोवऱ्यात! हायकोर्टाने केंद्रासह निर्मात्यांना बजावली नोटीस; चित्रपटावर गंभीर आरोप

Last Updated:

The Kerala Story 2: 'द केरला स्टोरी २ - गोज बियाँड' प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तो पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यात सापडला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: काही काळापूर्वी 'द केरला स्टोरी' या चित्रपटाने संपूर्ण देशात वादाचं वादळ निर्माण केलं होतं. आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच 'द केरला स्टोरी २ - गोज बियाँड' प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तो पुन्हा एकदा कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय, सेन्सॉर बोर्ड (CBFC) आणि चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे.
News18
News18
advertisement

टीझरमधील 'त्या' विधानांमुळे खळबळ

श्रीदेव नंबुदिरी या पेशाने जीवशास्त्रज्ञ (Biologist) असलेल्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार, चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर त्यांच्या सारासार विवेकाला धक्का बसला आहे. टीझरमध्ये केरळची प्रतिमा अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि नकारात्मक स्वरूपात मांडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'चा अंगावर शहारे आणणारा फर्स्ट लूक आऊट; 'या' शुभदिनी होणार रिलीज

advertisement

याचिकेत नमूद केल्याप्रमाणे, "या चित्रपटाच्या टीझरमध्ये केरळ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील तीन मुलींची कथा दाखवण्यात आली आहे. या मुली कशा प्रकारे दहशतवाद्यांच्या जाळ्यात अडकतात, ज्यांनी लग्नाचं आमिष दाखवून त्यांचं धर्मांतर केलं आणि देशाची लोकसंख्या बदलण्याचा प्रयत्न केला, असं यात चित्रित केलं गेलं आहे. टीझरमधील संवाद देशातील कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण करू शकतात."

advertisement

केरळच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह?

याचिकाकर्त्याचा मुख्य आक्षेप हा चित्रपटाच्या नावावर आहे. टीझरमध्ये इतर राज्यांतील कथा असल्या तरी चित्रपटाचं नाव 'द केरला स्टोरी' ठेवल्यामुळे प्रेक्षकांमध्ये असा समज निर्माण होतो की, या सर्व भयानक घटना केवळ केरळमध्येच घडत आहेत. यामुळे केरळच्या संपूर्ण लोकसंख्येला कलंकित केलं जात असून, प्रादेशिक आणि जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

advertisement

प्रदर्शनावर बंदी येणार का?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
‘उद्यानाचा निधी खर्च होत नाही’, शिवप्रेंमींवर आली भीक मागण्याची वेळ, काय घडलं?
सर्व पहा

हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मात्र, याचिकाकर्त्याने न्यायालयाकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यानुसार चित्रपटाच्या प्रदर्शनावर आणि सार्वजनिक प्रदर्शनावर तात्काळ स्थगिती आणली जावी आणि केंद्र सरकारने या प्रकरणातील फेरविचार याचिकेवर (Revision Petition) लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि तो निर्णय येईपर्यंत चित्रपटाचे प्रदर्शन रोखून धरावे, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'द केरला स्टोरी २' वादाच्या भोवऱ्यात! हायकोर्टाने केंद्रासह निर्मात्यांना बजावली नोटीस; चित्रपटावर गंभीर आरोप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल