ट्रेलरमध्ये काय आहे?
ट्रेलरबद्दल बोलायचे तर, ट्रेलरच्या सुरूवातीला धर्मांतरणाविषयी एक व्यक्ती बोलताना दिसत आहे. त्याने मध्यप्रदेश, राजस्थान आणि केरळा अशा तीन राज्यातल्या मुलींना तीन मुस्लिम मुलं लग्न करण्याच्या विचाराने रिलेशनशिपमध्ये येतात. नंतर त्यांना मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतरण करून त्यांना लग्न करण्यासाठी भाग पाडतात. अंगावर शहारे येणारा ह्या ट्रेलरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ट्रेलरच्या सुरूवातीला ‘पुढील 25 वर्षांमध्ये भारत एक इस्लामिक राष्ट्र होऊ शकतं.’ असं वाक्य ऐकू येतं. या वाक्यानेच सर्वांचेच लक्ष वेधलेय. ट्रेलरमध्ये अनेक मन हेलावून टाकणारे दृष्य पाहायला मिळतील. एका दृष्यामध्ये काही लोकं हिंदू मुलीला बळजबरीने गोमांस खायला घालताना दिसत आहेत.
advertisement
चित्रपटातील स्टारकास्ट
फसवणूक करत जबरदस्तीने लग्न करून धर्मांतरण करण्याच्या धक्कादायक गोष्टी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न कामख्या सिंग यांनी केला आहे. चित्रपटातील बरेचसे सीन्स आणि डायलॉग्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहेत. उल्का गुप्ता, आदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा या तीन अभिनेत्री चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या 27 फेब्रुवारी 2026 रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. 'द केरला स्टोरी' प्रमाणेच 'द केरला स्टोरी 2: गोज बियाँड' चित्रपटही हिट होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 'द केरला स्टोरी' चित्रपटानंतर कमालीचा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. परंतु अनेक ठिकाणी हा चित्रपट टॅक्स फ्री सुद्धा केलेला होता. ''द केरला स्टोरी 2: गोज बियाँड' चित्रपटाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
