'रुखवत' हा मराठी थ्रिलर सिनेमा लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंगावर काटा आणणारा हा ट्रेलर आहे.
काय आहे ट्रेलरमध्ये?
समोर आलेल्या ट्रेलरमध्ये दिसतंय की, संतोष जुवेकर आणि प्रियदर्शनी इंदलकर बाहुला-बाहुलीच्या रहस्यांच्या थरारामध्ये अडकत आहेत. त्यांना नेमकं काय चाललंय समजत नाही पण कोणीतरी त्यांना खेचत आहे असं वाटतंय. सस्पेन्सने भरलेला हा सिनेमा असून 'रुखवत'मध्ये दिल्या जाणाऱ्या बाहुला-बाहुलींवर असल्याचं दिसतंय. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा टच या सिनेमाला असल्याचं ट्रेलर पाहून समजतंय. ट्रेलर भीती वाढवत असून सिनेमा पाहण्याची उत्सुकताही वाढवत आहे.
advertisement
या सिनेमात अभिनेता संतोष जुवेकर आणि प्रियदर्शनी इंदलकर आहेत. 'रुखवत' सिनेमा 13 डिसेंबरला रिलीज होणार आहे. विक्रम प्रधान यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून रबी प्रोडक्शनची निर्मिती आहे.