Prajakta Mali: 'माझ्याबरोबर लग्न करणार का?' चाहत्याच्या प्रश्नाला प्राजक्ता माळीचं भन्नाट उत्तर, म्हणाली...

Last Updated:

अवघ्या महाराष्ट्राला हसरा स्वभाव आणि दमदार कलाकारीने वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. 'फुलवंती' सिनेमामुळे प्राजक्ता सध्या खूप चर्चेत आहे.

 'माझ्याबरोबर लग्न करणार का?' चाहत्याच्या प्रश्नाला प्राजक्ता माळीचं भन्नाट उत्तर
'माझ्याबरोबर लग्न करणार का?' चाहत्याच्या प्रश्नाला प्राजक्ता माळीचं भन्नाट उत्तर
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला हसरा स्वभाव आणि दमदार कलाकारीने वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. 'फुलवंती' सिनेमामुळे प्राजक्ता सध्या खूप चर्चेत आहे. तिचा निर्माती म्हणून हा पहिलाच सिनेमा असल्यामुळे तिच्या चाहत्यांकडून सिनेमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे 'फुलवंती' सिनेमा थिएटरमध्ये तर हाऊसफुल्ल राहिलाच आता ओटीटीवरही धुमाकूळ घालतोय. प्राजक्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानत आहे.
प्राजक्ताचा मोठा चाहतावर्ग आहे. तिला क्रेझी फॅनची अजिबात कमतरता नाही. तिच्यासाठी अनेक लोक वेडे आहेत. अशातच एका चाहत्याने प्राजक्ताला लग्नासाठी मागणी घातलीय. चाहत्याच्या या मागणीला प्राजक्ताने उत्तरही दिलं. जे सध्या इंटरनेटवर चांगलंच व्हायरल होतंय.
advertisement
चाहत्याकडून प्राजक्ताला लग्नाची मागणी
प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्रामवर प्रश्न उत्तराचं सेशन घेतलं. ज्यामध्ये ती म्हणाली, 'चला आज पहिल्यांदाच अशाप्रकारे गप्पा मारूया. तुमचे प्रश्न विचारा.' तर एका चाहत्याने प्राजक्ताला लग्नाची मागणी घातली. चाहता म्हणाला, 'तू माझ्याबरोबर लग्न करणार का? तुझ्यामुळे मी पण लग्न केलं नाही. आय लव्ह यू' चाहत्याच्या या प्रश्नाला प्राजक्ताने उत्तर दिलं. प्राजक्ता म्हणाली, 'माझं काही खरं नाही...तुम्ही करून टाका. (सगळेच जे थांबलेत)(जनहित में जारी..) (Spread the word..).'
advertisement
चाहत्याचा प्रश्न आणि प्राजक्ताचं उत्तर सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत असून जोरदार व्हायरल होत आहे. प्राजक्ताने सर्वच चाहते तिच्या लग्नाची वाट पाहत आहेत. तिला वारंवार लग्नाविषयी प्रश्न विचारले जातात. मात्र अद्याप प्राजक्ताचा लग्नाचा काहीच प्लॅन नसल्याचं ती वारंवार सांगत असते.
advertisement
दरम्यान, प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिच्या लाइफविषयी, कामाविषयी अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यांच्या कमेंटला उत्तर देत त्यांच्याशी संवाद साधते. त्यामुळे लोक तिला नेहमीच भरभरून प्रेम देतात. प्राजक्ता मराठीतील आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलंय.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Prajakta Mali: 'माझ्याबरोबर लग्न करणार का?' चाहत्याच्या प्रश्नाला प्राजक्ता माळीचं भन्नाट उत्तर, म्हणाली...
Next Article
advertisement
Solapur Crime News: अनैतिक संबंधांना विरोध केला अन् पतीनेच पत्नीला संपवलं! सोलापूरात हादरवणारी घटना
अनैतिक संबंधांना विरोध केला अन् पतीनेच पत्नीला संपवलं! सोलापूरात हादरवणारी घटना
  • अनैतिक संबंधांना विरोध केला अन् पतीनेच पत्नीला संपवलं! सोलापूरात हादरवणारी घटना

  • अनैतिक संबंधांना विरोध केला अन् पतीनेच पत्नीला संपवलं! सोलापूरात हादरवणारी घटना

  • अनैतिक संबंधांना विरोध केला अन् पतीनेच पत्नीला संपवलं! सोलापूरात हादरवणारी घटना

View All
advertisement