जवळपास १६ कोटींमध्ये विकला फ्लॅट!
नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, टायगर श्रॉफने मुंबईतील खार भागातील त्याचा आलिशान फ्लॅट तब्बल १५.६ कोटी रुपयांना विकला आहे. या फ्लॅटची खरेदी-विक्रीची नोंदणी सप्टेंबर २०२५ मध्ये झाली आहे. ‘रुस्तमजी पॅरामाउंट’ या इमारतीच्या २२ व्या मजल्यावर हा फ्लॅट आहे. या फ्लॅटचं कार्पेट एरिया १,९९० स्क्वेअर फूट आहे. विशेष म्हणजे, फ्लॅटसोबतच खरेदीदाराला तीन पार्किंग स्लॉट्स मिळाले आहेत. टायगरने हा फ्लॅट २०१८ मध्ये ११.६२ कोटी रुपयांना विकत घेतला होता. आता तो १५.६ कोटींना विकल्यामुळे त्याला चांगलाच फायदा झाला आहे.
advertisement
‘बागी ४’ची तीन दिवसांत ३० कोटींची कमाई!
‘बागी ४’ या चित्रपटाने तीन दिवसांमध्ये ३० कोटी रुपयांची कमाई केली आहे, जी अॅव्हरेज ओपनिंग मानली जाते. ‘बागी’ फ्रेंचायझीचा तिसरा भाग मार्च २०२० मध्ये रिलीज झाला होता, पण लगेचच कोविड-१९ मुळे लॉकडाऊन लागल्यामुळे त्याला बॉक्स ऑफिसवर पेक्षित यश मिळालं नव्हतं. त्यामुळे 'बागी ४'कडून सगळ्यांना खूप अपेक्षा होत्या, पण चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत सरासरी कमाई केली आहे. या चित्रपटाला हॉलीवूडचा ‘द कॉन्ज्यूरिंग: लास्ट राईट्स’ आणि 'द बंगाल फाईल्स' या चित्रपटांकडूनही टक्कर मिळाली आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत संजय दत्त, हरनाझ संधू आणि सोनम बाजवा हे कलाकारही आहेत.