TRENDING:

रात्री 2.30 वाजता दारावर ठकठक, ती येते अन्... जबरदस्त मराठी सिनेमा, Teaser

Last Updated:

कोकणातील पार्श्वभूमीवर आधारित मराठी सिनेमाचा थरारक टीझर रिलीज झाला आहे. मकरंद अनासपुरे सई ताम्हणकरसह दमदार कलाकार सिनेमात आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
येत्या काळात अनेक मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातील एका सिनेमानं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. अशाच एका सिनेमाचा टीझर समोर आला आहे. कोकणातील पार्श्वभूमीवर असलेला हा सिनेमा नक्कीच मनोरंजक ठरणार आहे असं दिसतंय. रात्री 2.30 वाजता ती येते आणि दारावर ठकठक करते. पुढे जे होतं त्यामुळे गावातील सगळे पुरूष घाबरून बसतात.
News18
News18
advertisement

तुंबाडची मंजुळा या सिनेमाविषयी आपण बोलत आहोत.  आपल्या पहिल्या पोस्टर मधूनच चित्रपटाच्या नावाविषयी, यातील कलाकारांविषयी आणि चित्रपटाची नेमकी गोष्ट काय असेल? याविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती.  झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचा धमाल आणि उत्कंठावर्धक टिझर आता प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

( 'तारक मेहता' शोमधील प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, दिशा वकानीशी अत्यंत जवळचं नातं )

advertisement

येत्या 5 जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या टीझरमधून ' मंजुळा ' या नावाविषयी तयार झालेलं गुढतेचं वलय, त्यावरून गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेली भीती आणि त्यांची उडालेली तारांबळ दिसत आहे. या गावकऱ्यांमध्ये एकाहून एक अतरंगी कलाकार आहेत.

जितेंद्र जोशी, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, रीलस्टार अथर्व रुके, नवोदित अभिनेत्री प्रियल नाईक आणि उषा नाडकर्णी यांचा समावेश आहे. यातही एका भविष्य सांगणाऱ्या गुरुजीच्या वेशात दिसणारे मकरंद अनासपुरे यांचा लुक, त्यांची देहबोली आणि संवाद प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. यासोबतच सगळ्यात जास्त आकर्षणाचा विषय ठरली आहे टीझरच्या शेवटी एका अर्धवट बंद दाराआड उभी दिसणारी सई ताम्हणकर. यामध्ये सईची काय भूमिका असेल ? याबद्दल सर्वांच्या मनात कुतूहल निर्माण झालं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गवतापासून बनवलेल्या खास पाँडिचेरी चटई, 150 रुपयांपासून करा खरेदी, मुंबईत हे आहे लोकेशन
सर्व पहा

ऋषिकेश तुरई यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विविध कोरगांवकर या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने केले आहे. झी स्टुडिओजतर्फे उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या 5 जून रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
रात्री 2.30 वाजता दारावर ठकठक, ती येते अन्... जबरदस्त मराठी सिनेमा, Teaser
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल