वैष्णवी हगवणे या प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान समोर आलेले एक विधान पुन्हा एकदा जनतेच्या मनात तीव्र आक्रोश निर्माण करत आहे. हगवणे कुटुंबीयांच्या वकीलाने सादर केलेल्या युक्तिवादाने तर लोकांचा आणखीनच संताप झाला. आता यावर अभिनेता हेमंत ढोमेने संतप्त पोस्ट शेअर केली आहे.
हगवणेच्या बैलासमोर नाचली, गौतमी पाटीलने अखेर त्या व्हिडीओवर मौन सोडलं
advertisement
काय म्हणाले वकील?
हगवणेंचे वकील म्हणाले, एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे हरॅसमेंट ठरत नाही. वैष्णवीला न्याय मिळवून देण्याऐवजी, वकिलाने तिच्या चारित्र्यावर घृणास्पद आरोप केले. तिने कथितपणे "नको त्या व्यक्तीसोबत चॅट" केले, असा नीच आरोप त्यांनी केला. इतकेच नव्हे, तर वैष्णवीची "प्रवृत्तीच आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी होती", असे सांगून तिच्या मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह उभे करण्याचा घृणास्पद प्रयत्न केला.
हेमंत ढोमेची पोस्ट
वकीलावरच केस फाईल करण्याची वेळ आलीय! हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरूषी विचार आता या काळात कोर्टात मांडणेदेखील अवमानकारक आहे… कठीण आहे!
दरम्यान, हेमंत ढोमे यांच्या या प्रतिक्रियेला हजारो लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे. सोशल मीडियावर या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.