Gautami Patil on Vaishnavi Hagwane : हगवणेच्या बैलासमोर नाचली, गौतमी पाटीलने अखेर त्या व्हिडीओवर मौन सोडलं

Last Updated:

Gautami Patil on Vaishnavi Hagwane : वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर डान्सर गौतमी पाटीलचा बैलासमोर नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्या व्हायरल व्हिडीओवर आणि वैष्णवी प्रकरणावर अखेर गौतमीनं मौन सोडलं आहे.

News18
News18
मुंबई : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात डान्सर गौतमी पाटील हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं.  डान्सर गौतमी पाटील हिनं अखेर त्या व्हिडीओवर मौन सोडलं आहे. काही महिन्यांपूर्वी वैष्णवीचा दीर सुशील हगवणे याने गौतमीला एका खासगी कार्यक्रमासाठी बोलावलं होतं. त्या कार्यक्रमात गौतमीने बैलासमोर डान्स सादर केला होता. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गौतमी म्हणाली, "आम्ही कलाकार आहोत आमचं काम फक्त कला सादर करणं असतं. कार्यक्रमाचं आयोजन आणि व्यवस्थापन मॅनेजमेंट टीम बघते. त्या कार्यक्रमाचं पूर्ण मानधन मिळालं होतं आणि शो उत्तम पार पडला. कार्यक्रमानंतर वैष्णवीबाबत घडलेल्या गोष्टींची माहिती नव्हती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तपशील विचारून घेतले तेव्हा असं सगळं झाल्याचं मला समजलं."
advertisement

दोषीला शिक्षा झाली पाहिजे - गौतमी

गौतमी म्हणाली, "ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. जो दोषी आहे त्याला लवकरात लवकर सापडून कडक शिक्षा झाली पाहिजे. वैष्णवीच्या कुटुंबाची भावना मी समजू शकते. मी तिच्या बाजूनेच आहे."
advertisement

कलाकारांना वादात ओढू नका - गौतमी

गौतमीने स्पष्ट केलं की, "आम्ही फक्त आमची कला सादर केली. एक विनंती आहे की कोणत्याही कलाकाराला त्याच्या कामाव्यतिरिक्त कोणत्याही वादात खेचू नका. मी फक्त डान्स केला होता. बाकीचं मला काहीही माहिती नाही."

महिलांसाठी खास संदेश

गौतमी पाटीलने महिलांसाठी एक स्पष्ट संदेश दिला. ती म्हणाली, "मी प्रत्येक वेळी सांगत असते, महिलांनी कोणालाही घाबरून शांत बसू नये. तुम्ही जर काही चुकीचं अनुभवत असाल तर लगेच बोला. नाहीतर ते आणखी त्रासदायक होत जातं. योग्य वाटतं ते करा आणि वेळेत निर्णय घ्या."
मराठी बातम्या/मनोरंजन/
Gautami Patil on Vaishnavi Hagwane : हगवणेच्या बैलासमोर नाचली, गौतमी पाटीलने अखेर त्या व्हिडीओवर मौन सोडलं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement