2 तास 7 मिनिटांचा क्राइम-थ्रिलर, झोप उडवणारी ही फिल्म या वीकेंडला OTT वर पाहाच

Last Updated:
Crime Thriller Film : क्राइम थ्रिलर चित्रपटांकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा असतात. प्रेक्षकांना या चित्रपटांमध्ये फक्त सस्पेन्स आणि अ‍ॅक्शनच नाही, तर कथेमध्येही जोरदार दम हवा असतो. आजच्या काळात प्रेक्षक कंटेंटबाबत खूपच समजदार झाले आहेत. म्हणूनच आता फक्त स्टार कास्टमुळे नाही, तर दमदार स्क्रिप्टमुळेही प्रेक्षक त्या चित्रपटासोबत जोडले जातात. क्राइम थ्रिलर या प्रकारातील प्रत्येक नवीन चित्रपट प्रेक्षक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात.
1/6
 प्लॅटफॉर्मवर दररोज नवनवीन चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. पण यातील काहीच चित्रपट प्रेक्षकांना आवडतात. यातील काही चित्रपट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात. अनेकदा हे चित्रपट फक्त मनोरंजनपुरते मर्यादित नसून समाजातील सत्य घटनादेखील समोर आणतात. वास्तववादी आणि भावनिकरित्या जोडणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. नुकतंच ओटीटीवर एक मनाला भिडणारा आणि विचार करायला भाग पाडणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

advertisement
2/6
 ओटीटीवर प्रदर्शित झालेला 2 तास 7 मिनिटांचा चित्रपट 17 ऑक्टोबरला ओटीटीवर रिलीज झाला आहे. अक्षय शेरेने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर जिओ स्टुडिओ, बावेजा स्टुडिओ आणि डॉग एन बोन पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

3/6
 उत्तर प्रदेशातील रॉबर्टसगंज या शहरावर आधारित या चित्रपटाचं कथानक आहे. एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात एका पोलिस इंस्पेक्टरची गोष्ट दाखवण्यात आली आहे. रहस्यमय पद्धतीने गायब होणाऱ्या मुलींच्या प्रकरणांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस इंस्पेक्टरची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. एकंदरीतच हा चित्रपट झोप उडवणारा आहे.

4/6
 'भगवत:चॅप्टर 1:राक्षस' असं या चित्रपटाचं नाव आहे. चित्रपटाची कथा इंस्पेक्टर विश्वास भगवत यांच्या भोवती फिरते. अरशद वारसीने या चित्रपट पोलीस इंसपेक्टरच्या भूमिकेला न्याय दिला आहे. त्याला एका छोट्या शहरात ट्रान्सफर केले जाते, जिथे एका मुलीच्या गायब होण्याच्या प्रकरणाची चौकशी करताना त्याला लक्षात येतं की हे फक्त एक प्रकरण नाही. हळूहळू उघड होतं की हे प्रकरण एका मोठ्या वेश्याव्यवसायाशी संबंधित आहे. याच दरम्यान त्याची भेट समीर नावाच्या प्राध्यापकाशी होते.

5/6
 'भगवत:चॅप्टर 1:राक्षस' या चित्रपटात अरशद वारसीसोबत जितेंद्र कुमार, आयेशा कदमस्कर, तारा अलीशा बेरी आणि हेमंत सैनी दिसले आहेत. अरशद वारसीने एका कडक पण संवेदनशील पोलीस अधिकाऱ्याची भूमिका अत्यंत कमालरित्या साकारली आहे. तर जितेंद्र कुमारने त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांना चकित केले. चित्रपटात सायकोलॉजिकल थ्रिल, भावना आणि सामाजिक मुद्द्यांचा उत्तम संगम पाहायला मिळतो. त्याची सिनेमॅटोग्राफी आणि बॅकग्राउंड म्युझिक कथेला अधिक प्रभावी बनवतात.

6/6
 'भगवत:चॅप्टर 1:राक्षस' या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. IMDb वर या चित्रपटाला 7.1/10 रेटिंग मिळाली आहे. तब्बल 35 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे शूटिंग उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावात केले गेले. ज्यामुळे तो अधिक खरा वाटतो. हा चित्रपट प्रेक्षकांना या वीकेंडला Zee5 वर पाहता येईल.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement