GK : सरकारी अधिकारी नेहमी हिरव्या शाईचा पेन का वापरतात? यामागचं कारण 99 टक्के लोकांना माहितीच नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
शाळेत शिक्षक लाल शाईचा पेन वापरतात, तर विद्यार्थी मुख्यत्वे निळ्या किंवा काळ्या पेनपुरतेच मर्यादित असतात. पण सरकारी कार्यालयात आणि खास करून राजपत्रित अधिकारी (Gazetted Officers) हिरवी शाई वापरण्याचा एक वेगळाच नियम आहे.
आपल्या शाळा, कॉलेज किंवा ऑफिसमध्ये प्रत्येकाला काही नियम आणि आचारसंहिता पाळणं गरजेचं असतं. यात अगदी छोट्या गोष्टींपर्यंत लक्ष दिलं जातं. जसं की पेन्सिल, पेन किंवा इतर स्टेशनरीच्या वापरावरही नियम असतात. उदाहरणार्थ, शाळेत शिक्षक लाल शाईचा पेन वापरतात, तर विद्यार्थी मुख्यत्वे निळ्या किंवा काळ्या पेनपुरतेच मर्यादित असतात. पण सरकारी कार्यालयात आणि खास करून राजपत्रित अधिकारी (Gazetted Officers) हिरवी शाई वापरण्याचा एक वेगळाच नियम आहे.
advertisement
advertisement
advertisement
मुख्य कारण म्हणजे हिरवी शाई वापरल्यास स्वाक्षरीची नक्कल करणे कठीण होते. जरी हिरवी शाई वापरूनही एखादा व्यक्ती स्वाक्षरी बनावट करण्याचा प्रयत्न करु शकतो पण तरी त्यामध्ये प्रामाणिकपणाचा आभास निर्माण होतो. हिरव्या शाईमुळे अधिकारी स्वतःला सहकारी किंवा इतर कर्मचाऱ्यांपासून वेगळं दाखवण्यासाठी वापरतो, म्हणजे हे एक प्रकारचं 'प्रतिनिधित्वचिन्ह' ठरतं.
advertisement
बँक कर्मचारी काय म्हणाले?भारतीय स्टेट बँकेच्या माजी कर्मचारी मधुकर पारे यांनी याची पुष्टी केली आहे. त्यानुसार, हा प्रोटोकॉल फक्त अधिकारी दर्जा आणि प्रोटोकॉल पाळण्यासाठी असतो. मधुकर म्हणाले की, भारतीय स्टेट बँकेचे सहायक महाप्रबंधक आणि निरीक्षक देखील हिरवी शाहीचा पेन वापरतात. इतर स्तरांवरील कर्मचारी मात्र पूर्वनिर्धारित शाहीच्या नियमांचे पालन करतात. ही सिस्टीम विशेषतः बँकेच्या परिसरासाठीच लागू आहे आणि यामुळे अधिकारी त्यांची ओळख आणि अधिकार स्पष्टपणे दाखवू शकतात.
advertisement
सरकारी कार्यालयात हिरवी शाही वापरण्याचं मुख्य उद्देश अधिकारी दर्जा, प्रामाणिकपणा आणि हस्ताक्षर सुरक्षा या तीन गोष्टींना प्राधान्य देणं आहे. हे नियम लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यास मदत करतात आणि अधिकारी स्वतःला इतरांपासून वेगळं दाखवू शकतात. त्यामुळे पुढच्या वेळी सरकारी अधिकारी हिरव्या शाईचा पेन वापरताना पाहिलात, तर त्यामागचं रहस्य लक्षात ठेवा. ही फक्त शैली नाही, तर सुरक्षा आणि अधिकाराची ओळख आहे.


