Vaishnavi Hagawane Death Mystery: 2 नव्हे तर 120 तास टॉर्चर, हत्यारंही शोधायची, पोलिसांच्या दाव्याने गूढ वाढलं

Last Updated:

Vaishnavi Hagawane Death Mystery: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात आता तपासाला नवे वळण मिळाले आहे. कोर्टात पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येवरून पोलिसांनी कोर्टाला धक्कादायक माहिती दिली आहे.

2 नव्हे तर 120 तास टॉर्चर, हत्यारंही शोधायची, पोलिसांच्या दाव्याने गूढ वाढलं
2 नव्हे तर 120 तास टॉर्चर, हत्यारंही शोधायची, पोलिसांच्या दाव्याने गूढ वाढलं
पुणे: पुण्यातील भुकूम गावातील हगवणे कुटुंबाच्या छळापायी आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणेच्या आरोपींना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले. या वेळी सरकारी आणि आरोपीच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात आता तपासाला नवे वळण मिळाले आहे. कोर्टात पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येवरून पोलिसांनी कोर्टाला धक्कादायक माहिती दिली आहे.
वैष्णवी हगवणेच्या प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपीचे असलेले राजकीय लागेबंध पाहता या प्रकरणाकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या 30 खुणा आढळल्याचं सांगितलं. यापैकी 15 जखमा आत्महत्या करण्यापूर्वी चोवीस तासांच्या आत असल्याची माहिती याआधीच समोर आली होती. वैष्णवीला सतत सासरच्या लोकांकडून आणि नवऱ्याकडून मारहाण होत असल्याचा आरोप करण्यात येत होता. तिच्या शवविच्छेदन अहवालात मारहाणीच्या जखमांबाबत भाष्य करण्यात आले आहे.
advertisement

वैष्णवीला झालेल्या मारहाणीबाबत मोठा खुलासा...

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. बुधवारी पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, पती शशांकने तिच्या मृत्यूपूर्वी पाच व तीन दिवस आधी तिला विविध हत्यारांनी मारहाण केली होती, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. संबंधित हत्यारे अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेली नाहीत. ती जप्त करण्यासाठी पुढील तपास आवश्यक असल्याने पोलिसांनी आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयात केली आहे.
advertisement

तपासात समोर येणार नवा खुलासा...

दरम्यान, पाचही आरोपींचे मोबाईल फोन अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेले नव्हते. त्यामुळे तपासात अडथळे येत होते. याच कारणास्तव पोलिसांनी न्यायालयात आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती केली होती. जेणेकरून मोबाईलचा शोध घेणे शक्य होईल. पोलिसांना जर आज हे मोबाईल हाती लागले, तर वैष्णवीच्या मृत्यूमागचे अनेक गूढ उकलू शकतात, असे म्हटले जात आहे.
advertisement

निलेश चव्हाण विरोधात ‘स्टँडिंग वॉरंट’

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची घटना घडली आहे. या प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाण याच्याविरोधात ‘स्टँडिंग वॉरंट’ (Standing Warrant) जारी करण्यात आले आहे. निलेश चव्हाण हा अद्याप फरार आहे. त्याच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेवर जप्ती आणण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, याबाबतची अधिकृत घोषणा आज केली जाण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
Vaishnavi Hagawane Death Mystery: 2 नव्हे तर 120 तास टॉर्चर, हत्यारंही शोधायची, पोलिसांच्या दाव्याने गूढ वाढलं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement