देवघर : विराट पुन्हा एकदा बाबा होणार, अनुष्का पुन्हा प्रेग्नंट आहे, अशा चर्चांना मागील अनेक दिवसांपासून उधाण आलं होतं, परंतु काहीजणांनी ही निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं होतं. अखेर काल या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला कारण बाळाच्या आई-बाबांनी स्वत: आपल्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली. वामिकाला लहान भाऊ झाल्याचं अनुष्का आणि विराटने जाहीर केलं आणि चाहत्यांच्या आनंदाला जणू पारावार उरला नाही.
advertisement
15 फेब्रुवारीला विरुष्काच्या बाळाचा जन्म झाला आणि त्यांनी त्याचं नाव 'अकाय' ठेवलं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर अकाय म्हणजे नेमकं काय, या नावाचा अर्थ काय हेच सर्च होतंय. शिवाय 15 फेब्रुवारी हा दिवस नेमका कसा होता हेसुद्धा पाहिलं जातंय. तसंच मोठेपणी अकाय क्रिकेटर होणार की अभिनेता होणार की, इतर कोणत्या क्षेत्रात नावलौकिक मिळवणार, हे कुतुहलाचे प्रश्नसुद्धा चाहत्यांना पडले आहेत. खरंतर आपलं भविष्य हे आपल्या जन्मवेळेवर ठरत असतं, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. प्रॅक्टिकली विचार केला तर आपला स्वभाव जसा असतो, त्यावरून आपलं भविष्य कसं असणार याचा साधारण अंदाज येतो. त्यामुळे आज आपण थेट ज्योतिषांकडूनच जाणून घेऊया की, विरुष्काच्या मुलाचा जन्म नेमका कोणत्या नक्षत्रात झाला आणि त्याचा स्वभाव कसा असेल.
Virat Anushka Baby: विरुष्काच्या मुलाचं नाव ठेवलं 'अकाय', कपलच्या नावाशी आहे खास कनेक्शन
झारखंडमधील देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल सांगतात की, 15 फेब्रुवारीला सर्व बाळांचा जन्म अश्विनी नक्षत्रात झाला. तेव्हा सर्वात शुभ अशी षष्ठी तिथी होती. विशेष बाब म्हणजे 15 फेब्रुवारीला शुक्ल आणि ब्रह्म हे दोन्ही योग एकत्र होते. हा कधीतरीच निर्माण होणार एक दुर्मीळ योग आहे. त्यामुळे या योगात बाळाचा जन्म होणं हे अत्यंत शुभ मानलं जातंय.
Celebrity Kids : अकाय! विराट-अनुष्काच्या मुलाप्रमाणे 'या' बॉलिवूड स्टारकिड्ची नाव आहेत फार युनिक
कसा असेल बाळाचा स्वभाव?
अश्विनी नक्षत्र, स्कंद षष्ठी तिथी, गुरूवार, मेष रास आणि शुक्ल, ब्रह्म योग ही अतिशय दुर्मीळ आणि शुभ वेळ आहे. या योगात जन्मणारं बाळ प्रचंड धनवान असेल. त्याला कधीच आर्थिक चणचण भासणार नाही. महत्त्वाचं म्हणजे देशभरात त्याला नावलौकिक मिळेल. गुरूवारी जन्मणाऱ्या बाळावर भगवान श्रीकृष्णाची सदैव कृपा असते. त्यामुळे हे बाळ आयुष्यभर सुंदर आणि भाग्यवान राहतं. ते कामात कुशल असेल परंतु शरिरात स्थूलपणा असू शकतो. या बाळाचा स्वभाव काहीसा चंचल असेल, परंतु त्याला प्रचंड लोकप्रियता मिळणार आहे, असं ज्योतिषांनी सांगितलं.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा