TRENDING:

EX गर्लफ्रेंडने तव्याने मारलं, श्वेता तिवारीसोबत जोडलं नाव, लव्ह लाइफमुळे अभिनेता फेमस

Last Updated:

Vishal Aditya Singh Birthday:टीव्हीतील प्रसिद्ध चेहरा आणि चर्चेत असणारं नाव म्हणजे अभिनेता विशाल आदित्य सिंग.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टीव्हीतील प्रसिद्ध चेहरा आणि चर्चेत असणारं नाव म्हणजे अभिनेता विशाल आदित्य सिंग. अभिनेता त्याच्या कामामुळे तर चर्चेत असतोच मात्र तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. त्याची लव्हलाइफ तर सर्वांनाच माहित आहे मात्र त्याचं कोस्टारसोबतही नाव जोडलं गेलंय. 25 जानेवारीला अभिनेत्याचा वाढदिवस असतो. यंदा तो 36 वर्षांचा होईल. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
श्वेता तिवारीसोबत जोडलं नाव, लव्ह लाइफमुळे अभिनेता फेमस
श्वेता तिवारीसोबत जोडलं नाव, लव्ह लाइफमुळे अभिनेता फेमस
advertisement

विशाल आदित्य सिंगचा जन्म बिहारमध्ये झाला. विशालला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मुंबईत आला होता. विशाल आदित्य सिंगने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. 2010 भोजपुरी मालिका 'जय जय शिव शंकर'मधून अभिनयाच्या जगात प्रवेश केला. विशालने 'चंद्रगुप्त मौर्य' या मालिकेत शशांकची भूमिका साकारली होती. त्यानंतर हा अभिनेता कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'ससुराल सिमर का'मध्येही दिसला आहे. सुरुवातीच्या काळात त्याने सहाय्यक भूमिका केल्या.

advertisement

Pak Pak Pakaak Actress: 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीला बनायचं नाही आई, का घेतला असा मोठा निर्णय?

2015 मध्ये, विशाल आदित्य सिंह 'बेगुसराय' मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. या मालिकेत विशालसोबत शिवांगी जोशी दिसली होती. या मालिकेतील विशालच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. 2017 मध्ये एकता कपूरने 'चंद्रकांता'मध्ये विशालला कास्ट केले. या मालिकेच्या सेटवरच विशालची मधुरिमा तुलीशी भेट झाली. त्यांची मैत्री प्रेमात बदलली. दोघांचं रिलेशनशिप खूप चर्चेत राहिलं.

advertisement

विशाल आणि मधुरिमा एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. हे कपल 'नच बलिए 9' मध्ये सहभागी झाले होते. शोदरम्यान विशाल आणि मधुरिमामध्ये खूप भांडण झाले होते. या दोघांमधील भांडणं सगळ्यांनाच माहित आहे. 'नच बलिए' संपल्यानंतर विशाल 'बिग बॉस'च्या घरात पोहोचला. शोमध्ये विशालची एन्ट्री झाल्यानंतर काही दिवसांनी मधुरिमानेही त्याच्यानंतर शोमध्ये प्रवेश केला. यामध्येही त्यांची खूप भांडणं पहायला मिळाली. या शोमध्ये येण्याअगोदर बराच काळ आधीच त्यांचं ब्रेकअप झालं होतं.

advertisement

मधुरिमा आणि विशाल यांनी 'बिग बॉस 13' मध्ये त्यांच्या भांडणामुळे खूप चर्चेत आले. एकदा या जोडप्यामध्ये असे भांडण झाले की विशालची एक्स गर्लफ्रेंड मधुरिमाने त्याला पॅन मारले. बिग बॉस शोची ही क्लिप आणि शोचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर अभिनेता खूप काळापासून सिंगलच आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी त्याचं नाव श्वेता तिवारीसोबत जोडलं गेलं. दोघांनी सोबत काम केलं असून तो तिला आई मानतो असं त्याने सांगितलं. त्यामुळे दोघांच्या लग्नाच्या आणि रिलेशनशिपच्या अफवा खोट्या असल्याचा खुलासा झाला.

मराठी बातम्या/मनोरंजन/
EX गर्लफ्रेंडने तव्याने मारलं, श्वेता तिवारीसोबत जोडलं नाव, लव्ह लाइफमुळे अभिनेता फेमस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल