रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट आणि ग्रीन अलर्ट अशा पद्धतीचे अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात येतात. तसेच अत्यंत मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टी, मुसळधार पाऊस, जोरदार पाऊस, मध्यम पाऊस आणि हलका पाऊस अशा पद्धतीच्या संज्ञा वापरण्यात येतात. हे वेगवेगळे अलर्ट आणि संज्ञा यांचा नक्की काय अर्थ असतो? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
advertisement
Monsoon Tips : पावसात छत्रीवर सुद्धा वीज पडू शकते का? मोबाईल बंद ठेवायचा?
सर्वात धोकादायक रेड अलर्ट
एखाद्या जिल्ह्याला 204 किंवा त्यापेक्षा अधिक मिलिमीटर पाऊस होणार असेल तर रेड अलर्ट दिला जातो. यासाठी हवामान विभाग अतिमुसळधार पाऊस, अतिवृष्टी यासारख्या सज्ञा वापरते. इंग्रजीमध्ये याला एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल असं म्हटलं जातं. या काळामध्ये त्या परिसरामध्ये भूस्खलखन, दरड कोसळणे, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात. सर्वसामान्य नागरिक आणि स्थानिक प्रशासनाला हा एक प्रकारचा सूचक इशारा असतो.
ऑरेंज अलर्ट कधी दिला जातो?
एखाद्या जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असेल, तर तिथे 115 ते 204 मिलिमीटर पावसाची शक्यता असते. हा देखील एक प्रकारचा धोक्याचा इशारा असतो सर्वसामान्य नागरिक व स्थानिक प्रशासनाने यासाठी तयारी करावी व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी हे यातून सूचित करायचं असतं. ऑरेंज अलर्ट साठी हवामान विभाग अति मुसळधार किंवा मुसळधार पाऊस अशा पद्धतीची संज्ञा वापरते.
यलो अलर्ट काय असतो?
तर 64 मिलिमीटर ते 115 मिलिमीटर पाऊस एखाद्या जिल्ह्यात होणार असेल तर हवामान विभागाकडून त्या जिल्ह्याला येल्लो अलर्ट जारी केला जातो. यासाठी हवामान विभागाकडून जोरदार पाऊस अशा पद्धतीची संज्ञा वापरली जाते. येलो अलर्ट असल्यानंतर सामान्य जीवन सुरू राहू शकते. परंतु नागरिकांनी येणाऱ्या आपत्तीसाठी तयार राहिले पाहिजे असा या अलर्टचा अर्थ असतो.
ग्रीन अलर्ट म्हणजे काय?
ग्रीन अलर्ट म्हणजेच कोणताही इशारा नाही. अशा पद्धतीचा एक अलर्ट हवामान विभाग जारी करत असते. यामध्ये सर्वसामान्य जीवनाला कुठलाही धोका नसतो. या काळामध्ये शून्य ते 64 मिलिमीटर पाऊस होऊ शकतो. यामध्येही 15 ते 64 मिलिमीटर पाऊस होणार असेल तर मध्यम पाऊस तर शून्य ते मिली पाऊस होणार असेल तर हलका पाऊस अशा पद्धतीची संज्ञा हवामान विभागाकडून वापरली जाते.