पोलिस आणि गुन्हेगार यांच्याशी संबंधित ही वेब सिरीज हे त्याच्या नावावरून लक्षात येत असले तरी ब्लॅक वॉरंट म्हणजे नेमके काय? हे अनेकांना अद्याप माहिती नाही. ब्लॅक वॉरंटचा अर्थ काय? तो कशाशी संबंधित आहे अशा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात..
ब्लॅक वॉरंट म्हणजे काय? (What is Black Warrant?)
'ब्लॅक वॉरंट' म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी थोडे कायद्याच्या पुस्तकात डोकवावे लागले. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आधीचे फौजदारी प्रक्रिया संहिते (Code of Criminal Procedure) मध्ये ब्लॅक वॉरंटचा उल्लेख येतो. CRPCमध्ये एकूण ५६ प्रकारचे फॉर्म आहेत. त्यापैकी फॉर्म क्रमांक ४२ ला ब्लॅक वॉरंट म्हणतात. फॉर्म नंबर ४२ हे एखाद्या प्रकरणात आरोपीला फाशी सुनावली जाते त्यासंबंधीचे आहे. यालाच डेथ वॉरंट किंवा फाशीचे वॉरंट असे देखील म्हटले जाते. सोप्या शब्दात सांगायचे तर आरोपीच्या मृत्यूच्या शिक्षेच्या अंमलबजावणीचे वॉरंट असे त्याला म्हणून शकतो. वॉरंटच्या अंमलबजावणीची माहिती आरोपीच्या कुटुंबीयांना आणि आरोपीच्या वकिलाला दिली जाते. कोर्ट जेव्हा ब्लॅक वॉरंट जारी करते तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की संबंधीत व्यक्तीला मरेपर्यंत फाशी द्यावी.
advertisement
ब्लॅक वॉरंट कधी काढतात?
एखाद्या गुन्हासाठी आरोपीला कोर्टाकडून शिक्षा सुनावल्यानंतर आणि त्याची दया याचिका फेटाळून लावल्यानंतर ब्लॅक वॉरंटची कारवाई सुरू होते. सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडून जेव्हा एखाद्या आरोपीची फाशीची शिक्षा कायम होते. तेव्हा राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करणे हा शेवटचा पर्याय असतो. जर राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला तर केंद्रीय गृहमंत्रालय तसा निर्णय तुरुंग अधिकाऱ्यांना कळवतात. त्यानंतर तुरुंगातील अधिकारी ब्लॅक वॉरंटसाठी न्यायालयात जातात.
ब्लॅक वॉरंट काय लिहलेले असते?
ब्लॅक वॉरंट हे आरोपीला ज्या तुरुंगात ठेवले असते त्या तुरुंगाच्या प्रमुखाला पाठवले जाते. ब्लॅक वॉरंटच्या पुढे ज्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली असते त्याचे नाव लिहलेले असते. या वॉरंटमध्ये फाशीची शिक्षा कधी द्यायची, तसेच जोपर्यंत त्याचा मृत्यू होत नाही तोपर्यंत त्याला फासावर लटकवून ठेवायचे हे देखील लिहलेले असते. ब्लॅक वॉरंटच्या खाली आरोपीला ज्यांनी फाशीची शिश्रा सुनावलेली असते त्या न्यायधीशांची स्वाक्षरी असते. फाशीची शिक्षा दिल्यानंंतर शिक्षेची अंमलबजावणी झाल्याचे प्रमाणीत करून ब्लॅक वॉरंट पुन्हा न्यायालयात पाठवावे लागते.
ब्लॅक वॉरंटचा नमुना (Warrant of Execution of a Sentence of Death (Form No. 42))
मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी वॉरंट (फॉर्म क्र. 42)
__ (जेलचे नाव) येथील जेलच्या प्रभारी अधिकाऱ्यास,
ज्या कारणास्तव ………… (कैद्याचे नाव, तो/ती), खटला क्रमांक ……….. (कॅलेंडर वर्ष) साठीच्या सत्राच्या वेळी माझ्यासमोर दिनांक ……….. 20……. रोजी (पहिला, दुसरा, तिसरा, जसे लागू असेल) कैदी म्हणून सत्र न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे; आणि दिनांक ……….. रोजीच्या न्यायालयाच्या वॉरंटनुसार तुमच्या ताब्यात देण्यात आले आहे; आणि ज्या कारणास्तव (उच्च न्यायालयाचे ठिकाण) येथील उच्च न्यायालयाने सदर शिक्षेला दुजोरा दिला आहे, त्याचा आदेश या न्यायालयास प्राप्त झाला आहे.
हे वॉरंट तुम्हाला आदेश देते आणि आवश्यकतेनुसार तुमच्याकडून सदर शिक्षा अंमलात आणण्याचा अधिकार देते. जेणेकरून ………… याला ………… येथे (फाशीची वेळ आणि ठिकाण)तोपर्यंत तो मृत होईपर्यंत गळ्याला फास लावून लटकवण्यात येईल.आणि ही अंमलबजावणी झाल्यानंतर या वॉरंटला प्रमाणित लेखासह परत पाठवावे ज्यामध्ये शिक्षा पूर्ण झाल्याचे नमूद केले असेल.
दिनांक: …………. महिना: …………. 20…….
(न्यायालयाची सील)
(स्वाक्षरी)