दुसऱ्या क्रमांकाचं उंच धरण
या धरणाचं काम 1948 मध्ये सुरू झालं आणि 1962 मध्ये ते पूर्ण झालं. 22 ऑक्टोबर 1963 रोजी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हे धरण देशाला समर्पित केलं. माहितीनुसार, जेव्हा हे धरण तयार झालं, तेव्हा ते देशातील सर्वात उंच धरण होतं. आता, 856 फूट उंच असलेल्या टिहरी धरणाच्या नंतर ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं उंच धरण आहे.
advertisement
हिमाचलमधील बिलासपूरच्या शिवालिक डोंगरांच्या दरम्यान बांधलेलं हे धरण 740 फूट उंच आणि 1700 फूट लांब आहे. त्याच्या पायाजवळची रुंदी 625 फूट आहे आणि वरच्या बाजूला ती 30 फूट आहे. याच्यापासून 13 किलोमीटर खाली असलेलं नांगल धरण 95 फूट उंच आणि 1000 फूट लांब आहे.
कालवा बांधण्याचा निर्णय खूप फायद्याचा ठरला
या धरणाचं नियोजन करणाऱ्या आणि ते उभारणाऱ्या इंजिनिअर्सनी या प्रकल्पाबद्दल दोन महत्त्वाचे निर्णय घेतले होते. पहिला म्हणजे भाक्रा धरण बांधायच्या आधी भाक्रा कालव्याचं काम पूर्ण करायचं आणि दुसरा म्हणजे परदेशी तज्ज्ञांच्या मदतीने हे धरण सरकारी विभागानेच बांधायचं. जरी एका अमेरिकन कंपनीने या धरणाचं डिझाइन तयार केलं होतं, तरी प्रत्यक्ष काम पाटबंधारे विभागाच्या इंजिनिअर्सनीच केलं. धरण बांधायच्या आधी कालवा बांधण्याचा निर्णय खूप फायद्याचा ठरला.
67 वर्षांपासून हा कालवा अविरत वाहतोय
गेल्या 7 दशकात या कालव्यातून पाण्याचा प्रवाह एक दिवसही थांबलेला नाही. या कालव्याने जवळपास 70 वर्षांपासून पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीला पाणी पुरवलं आहे. हा कालवा सुमारे 164 किलोमीटर लांब आहे. त्यापैकी 159 किलोमीटर पंजाबमध्ये आहे आणि बाकीचा हरियाणात. भाक्राचा हा मुख्य कालवा सतलज आणि बियास नद्यांमधून 1,25,000 क्युसेक पाणी भाक्रा कालव्यामार्गे हरियाणा आणि राजस्थानमध्ये पोहोचवतो. या कालव्यातील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी आणि शेतीसाठी होतो. गेल्या 67 वर्षांपासून हा कालवा असाच सतत वाहत आहे, म्हणजेच हा कालवा एकही दिवस थांबलेला नाही.
हे ही वाचा : सावधान! जुळ्या भावांसारखे दिसतात 'हे' 2 साप; एक बिनविषारी तर दुसरा विषारी; एक चूक अन् खेळ खल्लास!
हे ही वाचा : शाब्बास! ढाब्यावर काम करणाऱ्या तरुणाने सैन्यासाठी बनवलं खास सुरक्षा यंत्र, टॅलेंट पाहून वैज्ञानिकही चक्रावले
