advertisement

शाब्बास! ढाब्यावर काम करणाऱ्या तरुणाने सैन्यासाठी बनवलं खास सुरक्षा यंत्र, टॅलेंट पाहून वैज्ञानिकही चक्रावले

Last Updated:

अमन कलरा याने फक्त 5 हजार रुपयांत एक स्वयंचलित सुरक्षा गन तयार केली आहे. ही गन 30 फुटांवर शत्रू आल्यावर त्याला ट्रॅक करते आणि 13 फुटांच्या आत आल्यावर...

Aman Kalra
Aman Kalra
खरंच! म्हणतात ना, 'हुशारीला शिक्षणाची गरज नसते.' याचंच ताजं उदाहरण म्हणजे मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील अमन कालरा. अवघ्या 22 वर्षांच्या या तरुणानं असे अनेक शोध लावले आहेत, जे पाहून मोठे-मोठे वैज्ञानिकही चकित झाले आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अमन फक्त दहावीपर्यंत शिकलेला आहे. तरीही त्याची बुद्धी एखाद्या वैज्ञानिकापेक्षा कमी नाही.
अलिकडेच अमनने भंगारातून एक असं उपकरण बनवलं आहे, जे भविष्यात पहलगामसारखे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी खूप मदत करेल. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर अमनने एक सुरक्षा बंदूक प्रणाली (security gun system) तयार केली आहे, जी शत्रूंना 30 फुटांवरून ट्रॅक करेल आणि ते 13 फुटांच्या कक्षेत येताच स्वयंचलित गोळीबार सुरू करेल.
रात्री आणि कोणत्याही हवामानात काम करेल ही प्रणाली!
माणसांव्यतिरिक्त, ही प्रणाली रोबोट आणि ड्रोन शोधण्यासही सक्षम आहे. अमनने सांगितलं की, हे उपकरण अशा प्रकारे डिझाइन केलं आहे की ते कोणत्याही हवामानात काम करू शकतं. रात्रीच्या अंधारात सीमेवर घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना थांबवण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. हे उपकरण चारही दिशांना लक्ष ठेवू शकतं आणि जगातली कोणतीही मशीनगन त्यात सहजपणे बसवता येऊ शकते. याची खास गोष्ट म्हणजे ते चालवण्यासाठी कोणत्याही माणसाची किंवा इतर उपकरणाची गरज नाही. अमनने हे उपकरण फक्त दोन दिवसांत तयार केलं आहे आणि त्याचा खर्च फक्त पाच हजार रुपये आहे.
advertisement
त्याने यापूर्वीही केले आहेत अनेक शोध
मोबाईल ब्लूटूथवर चालणारे दोन रोबोट, दिव्यांगांसाठी सेन्सर्स असलेले चष्मे, रोबोटिक फायर फायटर आणि सैन्यासाठी स्वयंचलित बंदूक यांसारखे अनेक शोध त्याने यापूर्वीही लावले आहेत. अमन त्याच्या आई-वडील आणि बहिणीसोबत बांसवा गावात एका भाड्याच्या घरात राहतो. त्याचे वडील भाड्याच्या जागेवर एक हॉटेल किंवा ढाबा चालवतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे अमनने आठवीनंतर शिक्षण सोडलं होतं. यावर्षी त्याने खासगी माध्यमातून दहावीची परीक्षा पास केली. तो त्याच्या वडिलांना ढाब्यावर मदत करतो आणि फावल्या वेळेत भंगार वापरून नवीन गोष्टींचा प्रयोग करत असतो.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
शाब्बास! ढाब्यावर काम करणाऱ्या तरुणाने सैन्यासाठी बनवलं खास सुरक्षा यंत्र, टॅलेंट पाहून वैज्ञानिकही चक्रावले
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement