डायनासोरच्याही आधीचा पृथ्वीवरील सर्वात जुना प्राणी
आश्चर्याची गोष्ट म्हणजे विंचू हे कीटक नाहीत. कोळ्यासारखे दिसणारे हे 8 पायांचे प्राणी अरक्निड्स किंवा ऑक्टोपेड प्राणी आहेत. सहसा ते 1 ते 23 सेमी आकाराचे असतात आणि त्यांचे वजन 56 ग्रॅम पर्यंत असते. पण फार पूर्वी ते एक मीटर लांब असायचे. फार कमी लोकांना माहीत आहे की विंचू हे लाखो नव्हे तर करोडो वर्षांपूर्वीचे प्राणी आहेत. ते आजच्या जिवंत प्राण्यांमध्ये सर्वात जुने प्राणी असू शकतात. जीवाश्म दर्शवतात की ते 450 दशलक्ष वर्षांपूर्वीही पृथ्वीवर अस्तित्वात होते. तर प्रसिद्ध डायनासोरसारखे प्राणी 240 दशलक्ष वर्षांपूर्वीच पृथ्वीवर आले होते आणि आधुनिक मानव फक्त 2 लाख वर्षांपूर्वी आले.
advertisement
नर विंचू मादी विंचूला डान्स करून करतो प्रभावित
नर आणि मादी विंचू समागम करण्यापूर्वी नृत्य करतात. आणि हे नृत्य काही मिनिटांपासून तासन्तास चालू शकते. ते आधी एकमेकांचे समोरील हात-सारखे अवयव धरतात. मग ते मागे-पुढे सरपटायला लागतात. यादरम्यान, त्यांची शेपटी उंचावलेली राहते. नृत्याच्या शेवटी, नर विंचू मादीसाठी जमिनीवर शुक्राणू सोडतो आणि निघून जातो.
डंक मारताना किती विष सोडायचं ते विंचू ठरवू शकतात
धोका दिसल्यावर विंचू फक्त डंक मारून निघून जात नाहीत, तर डंक मारताना त्यांना किती विष सोडायचे आहे, हेही ते ठरवू शकतात. म्हणजेच, ते विषचा वापर खूपच किफायतीशीरपणे करतात असे दिसून आले आहे. काहीवेळा ते एखाद्या प्राण्याला चावतात आणि कोणतेही विष न सोडता निघून जातात. त्यांच्या डंखात डझनभर प्रकारच्या विषांचे मिश्रण असते आणि विंचवाच्या विषाचा फक्त एक चतुर्थांश भाग माणसाला मारण्यासाठी पुरेसा असतो.
पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान प्राणी
तुम्ही हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की विंचवाच्या डंखातील विष केवळ घातकच नसते. उलट, त्याचे औषधोपचारात अनेक उपयोग आहेत. त्याचे पदार्थ अनेक रोगांवर उपचार करण्यास सक्षम आहेत. याच कारणामुळे त्याच्या डंखातील विषाला खूप मागणी आहे आणि ते खूप मौल्यवान आहे. ते जगातील सर्वात महाग द्रव मानले जाते.
हे ही वाचा : General Knowledge : काच पारदर्शक कशी असते? त्यामागचं नेमकं वैज्ञानिक कारण काय?
हे ही वाचा : वेगाने बदलत आहेत पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र! शास्त्रज्ञ सांगतात, 'यामुळे होऊ शकतात हे भयंकर परिणाम'
