तरीही हा खिसा जीन्सच्या डिझाइनचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्या मागे एक रंजक इतिहास दडलेला आहे. हा खिसा, ज्याला अनेकदा वॉच पॉकेट म्हणतात, तो फक्त लहान वस्तू ठेवण्यासाठी नव्हता, तर भूतकाळातील एका विशिष्ट गरजेसाठी बनवला गेला होता. चला, या छोट्या खिश्यामागील कथा आणि आजच्या फॅशनमध्ये त्याचं महत्त्व जाणून घेऊया...
advertisement
जीन्स आणि पॉकेट वॉचची कथा 19व्या शतकात सुरू झाली
जीन्सचा इतिहास 1800 च्या दशकापासून सुरू होतो, जेव्हा त्या खास करून कामगार वर्गासाठी डिझाइन केल्या गेल्या होत्या. त्या काळात लोक घड्याळं खिशात ठेवत असत, ती मनगटावर घातली जात नव्हती. या घड्याळांना पट्टा नसायचा आणि जर ती सामान्य खिशात ठेवली तर तुटण्याचा धोका होता. त्यामुळे जीन्सच्या डिझाइनमध्ये एक वेगळा छोटा खिसा जोडण्यात आला, ज्यात कामगार आपली पॉकेट वॉच सुरक्षित ठेवू शकतील. तेव्हापासून त्याला "वॉच पॉकेट" असं नाव मिळालं.
आजच्या जगात कोणीही आपलं घड्याळ खिशात ठेवत नाही, तरीही हा छोटा खिसा प्रत्येक प्रकारच्या जीन्सचा भाग बनलेला आहे. कालांतराने या खिश्याला वेगवेगळी नावं मिळाली - जसं की कॉइन पॉकेट (नाण्यांचा खिसा), फ्रंटियर पॉकेट, मॅच पॉकेट (काडेपेटीचा खिसा) आणि तिकीट पॉकेट. प्रत्येक नावाने या खिश्याच्या वेगवेगळ्या वापराचा उल्लेख होतो. अनेक लोक यात नाणी, चाव्या किंवा अंगठ्या यांसारख्या लहान वस्तू ठेवतात.
आजच्या जीन्समध्ये हा छोटा खिसा अजूनही का आहे?
जरी या खिश्याचा वापर आता मर्यादित असला तरी, फॅशन उद्योगाने तो पूर्णपणे काढून टाकलेला नाही. याचं कारण असं की, हा खिसा जीन्सच्या क्लासिक डिझाइनचा एक भाग बनला आहे. काही ब्रँड्स आता हा खिसा थोडा मोठा करून अधिक उपयुक्त बनवत आहेत. तसेच, तो फॅशन आणि विंटेज लूकचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.
तर पुढच्या वेळी तुम्ही तुमची जीन्स घालाल आणि त्यात तो छोटा खिसा पाहाल, तेव्हा जाणून घ्या की त्याचा इतिहास शंभर वर्षांहून अधिक जुना आहे. तो केवळ एक डिझाइन घटक नाही तर भूतकाळातील गरजा आणि आजची स्टाईल यांचा मिलाफ आहे.
हे ही वाचा : विषारी साप 'या' झाडालाच का चिकटून राहतात? शेतकऱ्याने उलगडलं रहस्य!
हे ही वाचा : आश्चर्यच! शाकाहारी उंट विषारी जिवंत साप का खातो? यामागची विचित्र परंपरा ऐकून व्हाल चकित!
