इन्स्टाग्रामवरील व्हिडीओने दाखवलं ते ठिकाण
इन्स्टाग्राम युझर @vallijase यांनी नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात त्या 20 रुपयांच्या नोटेच्या मागील बाजूस दिसणारे ठिकाण दाखवत आहेत. व्हिडिओमध्ये वल्ली म्हणतात, "या क्षणी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आहोत जिथून 20 रुपयांच्या नोटेचं दृश्य घेतलं गेलं आहे." महिलेने आधी एक मोठी 20 रुपयांची नोट दाखवली; नंतर तिने कॅमेरा त्या दृश्याकडे वळवला.
advertisement
20 रुपयांच्या नोटेवर दिसणाऱ्या ठिकाणी महिला पोहोचली
तुम्ही पाहू शकता की, दोन झाडांच्या मधून समुद्र दिसत आहे आणि झाडांखाली एक बाल्कनीसारखी जागा आहे जिथे लोक उभे राहून फोटो काढू शकतात. समोर तुम्हाला घनदाट झाडे दिसतील आणि दूरवर समुद्रात एक बोट दिसू शकते. आता तुम्हाला वाटत असेल की हे ठिकाण कुठे आहे, तर तुम्हाला सांगतो की, हे अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह आहे, जिथे हे सुंदर दृश्य दिसतं.
या व्हिडिओला 38 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक लोकांनी हे ठिकाण कुठे आहे, असे विचारले. एकाने सांगितले की, त्यालाही आता या ठिकाणी जावेसे वाटत आहे. एकाने मस्करी करत म्हटले, "20 रुपयांचे दृश्य पाहण्यासाठी तुम्हाला 20 हजार रुपये खर्च करावे लागतील."
हे ही वाचा : साप रंग बदलतात का? सर्पमित्राने सांगितले धक्कादायक सत्य, ते ऐकून तुमचेही गैरसमज होतील दूर!
हे ही वाचा : या प्राण्याच्या दुधात असते दारू! पिताच येते जबरदस्त नशा; प्राण्याचं नाव ऐकून व्हाल थक्क!