कल्याण पूर्वेतील अनेक परिसरांमधील नागरिकांना पिण्याचे पाणी दूषित मिळत आहे. कोळसेवाडी, आनंदवाडी, काटेमानिवली, मंगल राघो नगर, कर्पेवाडी आणि चिकनीपाडा या परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यापासून पाण्याची समस्या आहे. या भागातील नागरिकांना प्यायचे पाणी गटारीत असलेल्या जुन्या आणि गंजलेल्या पाईपलाईनमधू येत असल्याची स्थिती आहे. या पाण्यामुळे कल्याण पूर्वेतील ज्येष्ठांना आणि लहान मुलांना गेल्या तीन महिन्यांमध्ये अनेक आजारांना सामोरं जावं लागलं आहे.
advertisement
या गंभीर मुद्द्यावर कल्याण पूर्वेतील स्थानिक नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत केडीएमसी आयुक्तांना स्मरणपत्र दिले आहे. सहा महिन्यांत ही समस्या न सोडवल्यास संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. अनेक वर्षांत वारंवार तक्रारी, आंदोलने केली; पण पालिकेने तात्पुरती दुरुस्ती सोडली तर काहीच केले नसल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे. विशेषत: नागरिकांना या समस्येला पावसाळ्यामध्ये सामोरं जावं लागतं.
