TRENDING:

...तर माझे कपडे विका, संतप्त वृद्धानं अधिकाऱ्यापुढेच काढले कपडे,खोपोलीत खळबळजनक प्रकार

Last Updated:

Senior Citizen Protest : घरासमोरील गटार कामासाठी पाच वर्षे प्रतीक्षा करून थकलेल्या कामासाठी एका व्यक्तीने खोपोली नगर परिषदेत अनोखे आंदोलन केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
खोपोली : आजवर महाराष्ट्रासह अन्य ठिकाणी विविध आंदोलने होत असतात. आंदोलन करण्याचे मार्ग कित्येकदा सर्वांना आश्चर्यात किंवा गोंधळून टाकणारे असतात. सध्या असाच एक प्रकार समोर आलेला आहे. जिथे थेट 67 वर्षीय आजोबांनी नवा मार्ग काढत नगर परिषदेत आंदोलन केले आहे.
News18
News18
advertisement

संतप्त वृद्धाने नगर परिषदेत मांडला रुद्रावतार

खोपोली नगर परिषदेत सोमवारी एक धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे दृश्य पाहायला मिळाले. घरासमोरील गटार बांधकामासाठी तब्बल पाच वर्षे पाठपुरावा करूनही दाद न मिळाल्याने 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक कस्तुरचंद राठोड यांनी थेट नगर परिषद कार्यालयात अनोखे आंदोलन केले.

अर्ज दिले, विनंत्या केल्या, पण..

शिळफाटा परिसरात राहणारे कस्तुरचंद राठोड गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्या घरासमोरील गटाराच्या कामासाठी नगर परिषदेकडे अर्ज, निवेदने आणि तक्रारी करत होते. त्यांनी किमान शंभरहून अधिक वेळा नगर परिषद कार्यालयात फेऱ्या मारल्या. मात्र प्रत्येक वेळी आश्वासन मिळाले काम मात्र झाले नाही.

advertisement

अखेर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या राठोड यांनी सोमवारी थेट अधिकाऱ्यांसमोर आपले कपडे उतरवून टेबलावर फेकले. ''जर तुमच्याकडे जनतेची कामे करण्यासाठी पैसे नसतील, तर माझे कपडे विका, पण माझ्या घरासमोरील गटाराचे काम करा,'' असे संताप त्यांनी बोलून दाखवला.

संपूर्ण शहराचे लक्ष प्रशासनाकडे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीच्या दरात मोठी उलथापालथ, आले आणि डाळिंबाला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

राठोड यांचा हा रुद्रावतार पाहून कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी अक्षरशहा गोंधळून गेले. काही काळ कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे नगर परिषदेच्या कार्यपद्धतीवर आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या अनोख्या आंदोलनानंतर तरी खोपोली नगर परिषद प्रशासन ठोस पावले उचलते का याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

advertisement

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
...तर माझे कपडे विका, संतप्त वृद्धानं अधिकाऱ्यापुढेच काढले कपडे,खोपोलीत खळबळजनक प्रकार
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल