भररस्त्यात 'दोष' उतरवण्याचा बनाव
मुलीच्या लग्नातील दोष उतरवण्याच्या बहाण्याने एका भोंदूबाबाने वयोवृद्ध व्यक्तीला फसवल्याची घटना समोर आलेली आहे. या घटनेप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी दीपर सावंत या नावाच्या व्यक्तीला कल्याणमधून अटक केलेली आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडीत व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मुलीच्या लग्नातील अडथळ्यामुळे चितेंत होते. त्यावर त्यांनी विविध ठिकाणी उपाय पाहिले मात्र काही मिळत नव्हते. त्याचवेळी दीपक याने स्वत:ला भोंदू(बाबा) भासवत काही विशेष विधी करुन दोष करुन करण्याचे आमिष दाखवले. त्यात अनेक विधीच्या नावाखाली त्याने पीडितांकडून त्यांचे सोन्याचे ब्रेसलेट तसेच चांदीची नाणी घेतली.
advertisement
याच संधीचा घेतला फायदा
विधी सरु असताना पीडितांकडून दागिने घेत ते एका लाल रंगाच्या रुमालात बांधून ठेवण्यास सांगितले आणि त्या क्षणी चलाखीने रुमालाची अदलाबदल केली. त्यानंतर दागिने असलेला दुसरा रुमाल घेऊन तो लगेच पसार झाला. काही वेळानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
पोलिसांनी पीडितांची तक्रार दाखल करुन लगेच तपास सुरु केला आणि आरोपी दीपकला कल्याणमधून अटक केली. दीपकने याआधी अशाच प्रकारे अनेक व्यक्तींना गंडा घातल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
