पेपरविक्रेत्याची कन्या आता सीए
ही सक्सेस स्टोरी आहे कल्याण शहरातील सुप्रियाची. पंकज बजगुजर यांची ही मुलगी आहे जिने 'इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (जानेवारी 2026)या परीक्षेत यश मिळवत चार्टर्ड अकाउंटंट अर्थात सीए बनण्याचा मान मिळवला आहे. या परिक्षेत सुप्रियाने 153 गुण मिळवून यश संपादन केले आहे.
पंकज बडगुजर हे कल्याण शहरात अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. हलाकीच्या परिस्थिती कुटुंब चालवत असताना त्यांनी सुप्रियाच्या शिक्षणासाठी कोणहीती कमतरता भासू दिली नाही. तिला शिक्षणासाठी लागणारे सर्व पाठबळ देत प्रोत्साहन दिले.
advertisement
वडिलांच्या कष्टाची जाणीव
यश प्राप्त केलेल्या सुप्रियालाही कायम वडिलांच्या कष्टांची जाणीव होतीच, त्यामुळे तिने शिक्षणात वारंवार प्रामाणिक मेहनत घेतली. जी एसी परीक्षा अत्यंत कठीण मानली जाते. त्यात तीने हे स्वप्न पूर्ण केले.
सुप्रियाच्या यशाने अवघ्या शहराची मान उंचावली
सुप्रियाच्या या यशामुळे तिच्या कुटुंबात आनंदाते वातावण निर्माण झाले आहे शिवाय परिसरातील नागरिक , मित्रमंडळी तसेच नातेवाईकांकडून सुप्रियाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
