कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या आतापर्यंत 51 जागा निवडून आल्या आहेत, तर आणखी 8 जागा निवडून येण्याची शक्यता आहे, त्यामुळे शिवसेनेची 62 च्या मॅजिक फिगरच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. याशिवाय शिवसेनेचे 4 अपक्ष बंडखोर निवडून आले आहेत. तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक आणि इतर अपक्ष शिवसेनेच्या संपर्कात आहे.
महापौरपदाचं स्वप्न भंगलं
दुसरीकडे भाजपला 41 जागांवर विजय मिळाला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेना युतीमध्ये निवडणूक लढली. युती धर्म पाळून शिवसेनेने भाजपला अडीच वर्ष महापौरपद द्यावं, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केली होती. आतापर्यंत कल्याण-डोंबिवलीमध्ये फक्त शिवसेनेलाचा महापौरपद मिळालं आहे आणि आताचे आकडे पाहूनही भाजपचं महापौरपदाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगण्याची शक्यता आहे.
advertisement
कल्याण-डोंबिवलीमध्ये अंबरनाथ पॅटर्न
कल्याण-डोंबिवलीमध्ये मतदानाच्या आधीच भाजपचे 15 आणि शिवसेनेचे 7 असे 22 नगरसेवक बिनविरोध निवडून आले, त्यानंतर कल्याणमध्येही सत्तेसाठी अंबरनाथ पॅटर्न राबवला जाणार का? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली होती. शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेसच्या 12 नगरसेवकांना पक्षात घेऊन सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या.
अंबरनाथमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 27, भाजपचे 14, अजित पवारांचे 4 आणि काँग्रेसचे 12 आणि 2 अपक्ष नगरसेवक निवडून आले. तर थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपने बाजी मारली. यानंतर भाजपने काँग्रेसचे 12 नगरसेवक पक्षात घेऊन संख्याबळ वाढवत शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण श्रीकांत शिंदेंनी राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांना गळाला लावलं आणि भाजपला धक्का दिला.
